Child Sleep Tips | रात्री मुलं झोपत नाहीत? तर मग फॉलो करा या टिप्स

Child Sleep Tips | रात्री मुलांना झोपवताना होते का त्रास? या 9 टिप्स अमलात आणा आणि मिळवा आरामदायी झोप
Child Sleep Tips
Child Sleep TipsCanva
Published on
Updated on

Child Sleep Tips

रात्री मुलांना झोपवताना पालकांची हालत खरंच खराब होते. झोप येण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या सवयींवर नियंत्रण ठेवून झोपेच्या आरोग्यावर (Sleep Hygiene) लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी भरपूर आणि वेळेवर झोप आवश्यक असते.

Child Sleep Tips
Pakistan diplomatic failure | 'मुस्लीम कार्ड'वरून 'या' देशाने पाकिस्तानला लाथाडले; भारतालाच दिला पाठिंबा; नेमकं काय घडलं?

मुलांना झोप आणण्यासाठी उपयुक्त 9 स्लीप हायजीन टिप्स:

  • नित्य रात्रीची झोपेपूर्व कृती ठरवा
    झोपेपूर्वी गरम पाण्याने अंघोळ, हळुवार संगीत, कैमोमाइल चहा, खोल श्वास घेणे, सौम्य स्ट्रेचिंग यामुळे मुलांना आराम मिळतो.

  • ब्राइट लाईट व स्क्रीनचा वापर मर्यादित करा
    संध्याकाळी मंद, गरम रंगाच्या लाइटचा वापर करा. मोबाईल, टॅब, टीव्ही यांसारख्या उपकरणांचे निळसर प्रकाश टाळा. शक्य असल्यास झोपण्याच्या एक तास आधी स्क्रीन बाजूला ठेवा.

  • नियमित झोपेची वेळ ठरवा
    रोज एकाच वेळेला झोपणं आणि उठणं शरीराच्या सर्केडियन रिदमसाठी उपयुक्त ठरतं. यामुळे मेलाटोनिन हार्मोन योग्य वेळी स्त्रवतो.

  • खोलीचं तापमान व वातावरण झोपेसाठी अनुकूल ठेवा
    खोली थंड, अंधारी आणि शांत ठेवा. प्रकाश व आवाज टाळण्यासाठी स्लीप मास्क आणि इअरप्लगचा वापर करा.

  • पूर्ण झोप घेणे अत्यंत गरजेचे
    शालेय वयातील मुलांना दररोज 9–12 तासांची झोप लागते. झोप अपुरी राहिल्यास मुलं दिवसातून थकलेली वाटतात.

  • सकाळी सूर्यप्रकाश घ्या
    उठल्यावर ताजी सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा. यामुळे मेंदूला जागृतीचा संकेत मिळतो आणि झोपेच्या हार्मोनचं उत्पादन थांबतं.

Child Sleep Tips
Pakistan Air Force Losses | चार दिवसांत पाकिस्तानची 6 फायटर जेट्स, 2 टेहळणी विमाने जमिनदोस्त; भारतीय हवाईदलाचा पराक्रम
  • कॅफिनयुक्त टाळा
    लहान मुलांनी कॅफिनयुक्त पदार्थ पूर्णपणे टाळावेत. प्रौढांनीही संध्याकाळी 3 नंतर कॅ फिन घेणं टाळावं.

  • दुपारच्या झोपेवर मर्यादा ठेवा
    गरज नसताना जबरदस्तीची दुपारची झोप रात्री झोपेस अडथळा ठरू शकते.

  • व्यायाम आवश्यक आहे
    नियमित व्यायामामुळे रात्री झोप चांगली लागते. मात्र झोपण्याच्या वेळेपूर्वीच्या वेळात व्यायाम टाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news