Healthy Diet Canva
आरोग्य

Healthy Diet | हृदय, पचन आणि त्वचेसाठी उपयुक्त असा दलिया आहे सुपरफूड

Healthy Diet | फायबरने भरलेला दलिया, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे

shreya kulkarni

आजकाल ओट्स हा नाश्त्यासाठी एक अतिशय लोकप्रिय पर्याय मानला जातो. पण जर तुम्हाला ओट्स खाण्याचा कंटाळा आला असेल, किंवा तो खायला आवडत नसेल, तर चिंता करू नका. ओट्सइतकाच आरोग्यासाठी फायदेशीर असलेला एक पर्याय म्हणजे दलिया. फायबर, प्रोटीन आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांनी भरलेला दलिया अनेक आरोग्य फायदे देतो, त्यात वजन कमी करणे हे महत्त्वाचे आहे.

आरोग्यसाठी उत्तम नाश्ता

भारतीय घरांमध्ये दलिया नेहमीच खाल्ला जातो, पण अलीकडे वाढत्या हेल्थ अवेअरनेसमुळे लोकांनी त्याच्या फायद्यांकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ओट्सचा पर्याय शोधत असाल, तर नाश्त्यात दलिया ही एक चविष्ट, आरोग्यदायी आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण निवड ठरू शकते.

नाश्त्यात दलिया खाण्याचे फायदे

1. वजन कमी करण्यात मदत


दलियात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी चांगले असते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाण्याची गरज लागत नाही. यामुळे एकूण कॅलोरीचे प्रमाण कमी राहते आणि वजन नियंत्रणात राहते. 'जर्नल ऑफ न्यूट्रिशन'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डायटरी फायबर वजन कमी करण्यात उपयुक्त ठरतो. साबूत धान्यांमुळे वजन संतुलित ठेवण्यास मदत मिळते.

2. मसल्स वाढवतो आणि ऊर्जा देतो


मांसपेशी तयार करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. दलिया हा प्रोटीनसह अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे. हे मसल्स तयार करण्यात मदत करतं आणि शरीराला ताकद प्रदान करतं.

3. पचनक्रिया सुधारते

दलियामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. दररोज सकाळी दलिया खाल्ल्यास पोट साफ होण्यात मदत होते आणि दिवसभर हलके वाटते.

4. हृदयासाठी फायदेशीर

दलियात कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूपच कमी असते आणि ते LDL (वाईट कोलेस्टेरॉल) कमी करण्यात मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दलिया खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो, जे हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहे.

5. रक्तातील साखरेवर नियंत्रण

दलिया हळूहळू पचणारे अन्न आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी दलिया एक सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो. रोज सकाळी दलिया खाल्ल्यास साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

6. त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर

दलियातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि वयापेक्षा तरुण दिसू शकता.

7. बाळंतपणानंतर महिलांसाठी उपयुक्त

गर्भधारणेनंतर महिलांना पोषणयुक्त आणि हलका आहार आवश्यक असतो. दलिया यासाठी योग्य पर्याय आहे. हे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवते आणि शरीराची ताकदही परत मिळवून देते.

दलिया बनवण्याचे काही हेल्दी प्रकार

  • दुधासोबत गोडसर दलिया – थोडा मध, ड्रायफ्रूट्स आणि दुधात बनवलेला

  • भाजीपाला घालून खमंग नमकीन दलिया करता येईल

  • सूपसारखा दलिया – हळद, आले, लसूण, भाज्यांसह

  • फळं घालून फ्रूट डिलाइट दलिया

जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा फिट राहण्याचा विचार करत असाल, तर नाश्त्यात दलियाचा समावेश करणे ही एक स्मार्ट आणि आरोग्यदायी निवड ठरेल. याच्या नियमित सेवनामुळे शरीराला संपूर्ण पोषण मिळते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT