Beetroot Juice णोलनो
आरोग्य

Beetroot Juice: आरोग्याचा खजिना ठरणारा बीटचा रस! रक्तदाब, त्वचा आणि यकृतासाठी फायदेशीर

Beetroot Juice: बीटचा रस हा अनेक आजारांपासून बचाव करणारा आणि संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक आहे.

shreya kulkarni

बीटचा रस हा अनेक आजारांपासून बचाव करणारा आणि संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक आहे. बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि नायट्रेट्स आढळतात, जे शरीरातील विविध क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

बीटाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे

1. उच्च रक्तदाबावर नियंत्रण

बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स भरपूर असतात. हे नायट्रेट्स शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात, जे रक्तवाहिन्या शिथिल करतात आणि रक्तप्रवाह सुरळीत करतात. यामुळे सिस्टोलिक व डायस्टोलिक रक्तदाब दोन्ही घटतात. संशोधनानुसार, दररोज २५० मि.ली. बीटचा रस प्यायल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

2. त्वचेला नैसर्गिक चमक मिळते

बीटातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचा निरोगी ठेवतात. हे त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर टाकतात, पिग्मेंटेशन कमी करतात आणि रंग उजळवतात. नियमितपणे बीटचा रस घेतल्यास त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

3. पचनक्रिया सुधारते

बीटात बीटाईन नावाचा एक विशेष घटक असतो, जो पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करतो. हा घटक पोटातील आम्ल तयार होण्यास मदत करतो, जे अन्नाचे पचन आणि पोषकतत्त्वांचे शोषण सुलभ करते. यामुळे अपचन, गॅस व कब्ज यांसारख्या समस्या दूर होतात.

4. यकृताचे आरोग्य सुधारते

बीट लिव्हरसाठी उत्तम डिटॉक्सिफायर आहे. बीटाईन, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषकतत्त्व यकृतातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. यामुळे फॅटी लिव्हरसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते.

बीटचा रस केव्हा प्यावा?

  • सकाळी उपाशीपोटी पिणे सर्वाधिक फायदेशीर.

  • व्यायामाच्या 30 मिनिटे आधी पिल्यास स्टॅमिना वाढतो.

  • दिवसातून एकदा 100-250 मि.ली. इतकं प्रमाण योग्य.

कोणाला बीटचा रस टाळावा?

  • लो ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्यावा.

  • किडनी स्टोन चा त्रास असल्यास बीटमध्ये असणारे ऑक्सलेट्स त्रासदायक ठरू शकतात.

  • मधुमेही रुग्णांनी प्रमाणात वापर करावा कारण त्यात नैसर्गिक साखर असते.

बीटचा रस पिताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

  • रस काढून लगेच प्यावा. उशीर केल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात.

  • गाजर, आंबट सफरचंद, आले, लिंबू अशांसोबत मिसळून प्यायल्यास चव व पोषणमूल्य वाढते.

  • दिवसातून एकदा पुरेसा असतो – अति सेवन करू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT