फेशियल हा चेहऱ्याच्या त्वचेसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. यामुळे चेहऱ्यावरील मळ, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स दूर होतात आणि त्वचेवर त्वरित ग्लो येतो. मात्र, फेशियलचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या त्वचेच्या प्रकार आणि ऋतूनुसार योग्य फेशियल निवडतो.
ब्युटीशियन ऋतुजा खाडे, सांगतात की ऋतूनुसार फेशियल केल्याने त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहते. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत त्वचेला वेगळी काळजी लागते. चला जाणून घेऊया, कोणत्या ऋतूत कोणते फेशियल करणे फायदेशीर ठरेल.
उन्हाळ्यात त्वचेत जास्त तेलकटपणा येतो आणि चेहरा चिकट वाटू लागतो. यासाठी डिटॉक्सिफायिंग, एक्सफोलिएटिंग आणि सुखदायक फेशियल उत्तम असतात.
कोरफडीच्या जेलने केलेले फेशियल त्वचेला शांत करतात.
ग्रीन टी असलेले फेशियल त्वचेला अँटीऑक्सिडंट्स पुरवतात.
फळांचे फेशियल त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात आणि मृत पेशी दूर करतात.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खवखवीत होते. यासाठी मॉइश्चरायझिंग फेशियल सर्वोत्तम.
बदाम तेल, हायल्युरोनिक अॅसिड असलेले फेशियल त्वचेला हायड्रेट करतात.
कोमट पाण्याने चेहरा धुवावा, गरम पाण्याचा वापर टाळावा.
यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते.
पावसाळ्यात त्वचेवर जास्त तेलकटपणा येतो आणि पिंपल्सची समस्या वाढते.
चारकोल किंवा कडुलिंब असलेले डिटॉक्स फेशियल या काळात योग्य ठरतात.
यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि अतिरिक्त तेल कमी होते.
फेशियल केल्यानंतर २४ तास साबण किंवा फेसवॉश वापरू नका.
थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका, नेहमी सनस्क्रीन लावा.
त्वचेला हात लावणे टाळा आणि हलका मॉइश्चरायझर वापरा.
फेशियलनंतर लगेच मेकअप करू नका.
फेशियल करण्यापूर्वी तुमचा त्वचेचा प्रकार ब्युटीशियनला नक्की सांगा. ती त्यानुसार योग्य उपचार सुचवेल.