Digestion Tips  Canva
आरोग्य

Digestion Tips | जेवणानंतर टाळा या सवयी, पचनतंत्र सुधारण्यासाठी आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितले महत्त्वाचे नियम

Digestion Tips | आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनक्रियेचे योग्य रीतीने चालणे अत्यावश्यक असते.

shreya kulkarni

Digestion Tips

आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनक्रियेचे योग्य रीतीने चालणे अत्यावश्यक असते. पचनतंत्र नीटस चालत नसेल, तर शरीरात अपचन, गॅस, जडपणा, मळमळ, आम्लपित्त अशा अनेक तक्रारी होतात. योग्य पचनामुळे शरीराला पोषण मिळतं, ऊर्जा वाढते आणि प्रतिकारशक्तीही मजबूत होते. शिवाय मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

मात्र, अनेकदा लोक नकळत काही चुकीच्या सवयी करतात ज्या पचनक्रियेस अडथळा आणतात. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी अशाच काही सवयींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, जी आपण टाळल्यास आपली पचनक्रिया सुधारू शकते.

जेवणानंतर ताबडतोब झोपणे टाळा

बरेच लोक जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय लावून घेतात. मात्र, डॉक्टर सांगतात की हे आरोग्यासाठी घातक असू शकते. जेवणानंतर झोपल्याने शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोट बिघडण्याची शक्यता वाढते.

लगेच भरपूर पाणी पिणे टाळा

जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिणे पचनावर विपरीत परिणाम करू शकते. तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी आणि लगेच नंतर पाणी पिणं टाळावं. यामुळे पचन प्रक्रिया बिघडते आणि अन्न योग्य प्रकारे पचत नाही.

स्नान, पोहणे किंवा चालणे लगेच करू नका

जेवणानंतर स्नान केल्यास शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे पचन क्रिया मंदावते. स्नान किमान २ तासांनी करावं. त्याचप्रमाणे, जेवणानंतर त्वरित पोहणे किंवा दीर्घ पायपीट करणं वर्ज्य आहे, कारण यामुळे वात वाढतो आणि पचनात अडथळा निर्माण होतो. तसेच, जेवणानंतर लगेच अभ्यास करणेही टाळावं, कारण यामुळे एकाग्रता आणि पचन दोन्हीवर परिणाम होतो.

पचन सुधारण्यासाठी काय करावं?

जेवणानंतर वज्रासनात बसल्यास खालच्या पोटात रक्तप्रवाह वाढतो आणि मेटाबॉलिझम सक्रिय होतो. त्यामुळे गॅस, आम्लपित्त, अपचन, आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, जेवणानंतर १०–१५ मिनिटांची हळूहळू चालणंही उपयुक्त ठरतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT