

मधुमेह असणार्या रुग्णांना अनेक वेळा रात्री झोपताना किंवा झोपेत अचानक रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढल्याचं लक्षात येतं. ही परिस्थिती वारंवार होत असल्यास ती शरीरातील हार्मोनल बदल, अयोग्य आहार किंवा झोपेच्या सवयींशी संबंधित असू शकते.
झोपताना शरीरातील इन्सुलिन उत्पादन कमी होते. इन्सुलिनचं काम म्हणजे रक्तातील साखरेला पेशींमध्ये पोहोचवणं. इन्सुलिन योग्य प्रमाणात नसेल, तर साखर रक्तातच राहते आणि पातळी वाढते.
रात्री आपण भात, गोड पदार्थ, बिस्कीट, ब्रेडसारखे पदार्थ खाल्ले, तर ते शरीरात लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे साखर जळण्याचा वेग कमी होतो. नीट झोप न लागल्यास शरीराची इन्सुलिनप्रती संवेदनशीलता कमी होते. परिणामी, साखर नियंत्रित ठेवणं कठीण होतं.
याखेरीज रात्रीच्या वेळी कोर्टिसोल नावाचा हार्मोन शरीरात अधिक प्रमाणात तयार होतो. हा हार्मोन शरीरात साखरेची पातळी वाढवतो.
‘डॉन इफेक्ट’ किंवा ‘रिबाऊंड हायपरग्लायसेमिया’ : काही रुग्णांमध्ये रात्री ब्लडशुगरची पातळी खूप खाली जाते. परिणामी, ती वाढवण्यासाठी शरीर जास्त ग्लूकोज तयार करतं. याला ‘रिबाऊंड’ इफेक्ट म्हणतात.
झोपेतून घामाने जाग येणे, थरथर, अस्वस्थपणा
दिवसभर थकवा, डोकेदुखी
डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम
दीर्घकाळ शुगर नियंत्रित न राहिल्यास मूत्रपिंड, यकृत, हृदयावर परिणाम
रात्री हलका आहार घ्या. संध्याकाळी सात वाजल्यानंतर जेवण घेण्याचं टाळा. रात्री पोळी, फळं, भाजी, कडधान्ये यांचा समावेश असलेला हलका आहार घ्या.
भात, साखर, गोड पदार्थ, गव्हाचे पदार्थ, आलू, मैदा यांचे सेवन रात्री टाळा.
झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. हे साखर कमी करण्यात मदत करतो.
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर साखरेची पातळी तपासून ठेवा.
डॉक्टरी सल्ल्याने इन्सुलिन किंवा गोळ्या घेत राहा. बदल केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.
प्राणायाम, ध्यान, संगीत यांद्वारे मानसिक तणाव कमी करा. रोज 7-8 तासांची शांत झोप आवश्यक आहे.