Belly Fat Tips Online Pudhari
आरोग्य

Belly Fat Tips | फक्त 20 मिनिटांचा नाइट रूटीन, पोट कमी करायला पुरेसा! जाणून घ्या कसं

Belly Fat Tips | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना वाढते वजन, मोठं झालेलं पोट आणि थकवा यांचा त्रास होतो.

shreya kulkarni

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना वाढते वजन, मोठं झालेलं पोट आणि थकवा यांचा त्रास होतो. विशेषतः रात्रीच्या वेळची चुकीची सवय जसं की उशिरा जेवणं, लगेच झोपणं, मोबाईल स्क्रोल करत बसणं यामुळे पचनावर परिणाम होतो आणि पोटाभोवती चरबी साठते.

पण जर तुम्ही फक्त 20 मिनिटं तुमच्या रात्रीच्या वेळेवर योग्य पद्धतीनं लक्ष दिलंत, तर तुम्हाला ना महागडं जिम लागतं ना कोणतेही डाएट सप्लिमेंट्स. केवळ शिस्तबद्ध जीवनशैलीनं तुम्ही सडपातळ शरीर मिळवू शकता.

चला पाहूया, रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या 3 सवयी तुमचं शरीर फिट आणि पोट सडपातळ ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

१. जेवल्यानंतर कोमट पाणी प्या;  पचन सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग

जेवणानंतर थोडा वेळ थांबून (सुमारे ३० मिनिटांनी) एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास तुमचं पचनक्रिया सुधारते. कोमट पाण्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी हळूहळू वितळायला सुरुवात होते.

यामुळे तुमचं मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) अधिक वेगानं काम करतं आणि अन्न पचायला मदत होते. पण लक्षात ठेवा जेवण करताच लगेच पाणी पिणं टाळा, कारण त्यामुळे पचन मंदावू शकतं.

२. मोबाईल दूर ठेवा आणि लवकर झोपा — झोपेचं महत्त्व पोटासाठी

खूपजणांना सवय असते, जेवल्यावर लगेच मोबाईल घेऊन बिछान्यावर पडणं. पण ही सवय शरीरासाठी फार हानिकारक आहे.

रात्री झोपेआधी फोन वापरल्याने तुमचं मेंदू सतत अ‍ॅक्टिव्ह राहतं, नीट झोप लागत नाही, आणि त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतो. अशा झोपेच्या अडथळ्यांमुळे हार्मोनल असंतुलन होतं आणि चरबी साठते.

त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर कमीत कमी १ तास मोबाईलपासून दूर रहा आणि झोपण्याची वेळ ठरवा. झोप पुरेशी झाली की शरीराचा नैसर्गिक फॅट बर्निंग प्रोसेस सुरळीत होतो.

३. जेवण लवकर आणि चालणं नियमित

डायटिशियन आणि फिटनेस तज्ज्ञ सांगतात की, रात्री उशिरा जेवण केल्यास ते पचनासाठी अपायकारक असतं.

तुमचं जेवण शक्यतो संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान झालं पाहिजे. यामुळे अन्न व्यवस्थित पचतं आणि शरीरात चरबी साठत नाही.

त्यासोबत, जेवल्यानंतर १०–१५ मिनिटं थांबून तुम्ही १५–२० मिनिटांची सौम्य वॉक केलीत, तर ते अधिक फायदेशीर ठरतं.

या चालण्यामुळे:

  • पचन सुधारतं

  • ब्लड शुगर नियंत्रित राहतं

  • पोटाची सूज कमी होते

  • आणि अतिरिक्त फॅट साठण्याची शक्यता टळते

झोपण्यापूर्वी बिछान्यावरच हलकं स्ट्रेचिंग करा

जर चालणं शक्य नसेल, तर झोपण्याआधी बिछान्यावर हे ५ मिनिटांचे योगासन कराच:

  • सुप्त बद्धकोणासन (लेटून तितली पोज)

  • पवनमुक्तासन (गॅस आणि सूज कमी करण्यासाठी)

  • पाय भिंतीवर टेकवून झोपा (ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी)

ही आसने शरीर शिथिल करतात, पचन सुधारतात आणि झोप गोड लागते.

तुमच्या शरीरात बदल हवा आहे? तर कोणतेही महागडे उपाय न करता, फक्त रात्रीच्या या 3 सवयी पाळा हळूहळू तुमचं पोट सपाट होईल, आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होईल!

  • कोमट पाणी

  • वेळेवर जेवण

  • आणि थोडं चालणं किंवा स्ट्रेचिंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT