

Bad Food For Heart
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अगदी चालताना, व्यायाम करताना, नाचताना लोक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार आणि चुकीच्या सवयी.
आजारांना निमंत्रण देणारे सर्वात मोठे माध्यम म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील काही ‘गुप्त शत्रू’. ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट, अधिक मीठ आणि साखर असलेले अन्नपदार्थ हे हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरतात. प्रोसेस्ड, डीप फ्राईड आणि जंक फूड्सचा अधिक वापर केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. काहीजण जिममध्ये शरीर बनवण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट घेतात, तेही हृदयविकाराचे मोठे कारण बनू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींना दूर ठेवणे आवश्यक आहे.
कुकीज, पेस्ट्रीज, फ्रोझन स्नॅक्स:
यामध्ये भरपूर प्रमाणात ट्रान्स फॅट असते. हे फॅट शरीरात ‘बॅड कोलेस्टेरॉल’ वाढवते आणि धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकते
प्रोसेस्ड मीट (सॉसेज, बेकन):
ह्या पदार्थांमध्ये सोडियम, सॅच्युरेटेड फॅट आणि नायट्रेट्स असते. हे घटक रक्तदाब वाढवतात आणि धमन्यांची लवचिकता कमी करतात.
डीप फ्राय अन्नपदार्थ (समोसे, भजी, फ्रेंच फ्राईज, ब्रेड पकोडे):
गरम तेलात तळल्यामुळे हे पदार्थ ट्रान्स फॅटने भरलेले असतात, जे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
अधिक मिठाचे पदार्थ (लोणची, पापड, चिप्स, इंस्टंट नूडल्स):
ह्या अन्नपदार्थांमध्ये अत्यधिक सोडियम असतो, जो रक्तदाब वाढवून स्ट्रोक व हृदयविकाराचा धोका वाढवतो.
अत्यधिक साखरेचे पदार्थ (कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, मिठाई):
यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, मधुमेहाचा धोका निर्माण होतो आणि हृदयावर ताण येतो.