Apple job ही जगातील सर्वात तंत्रज्ञानातील मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. ग्राहकांसाठी Apple कडून ग्राहकांसाठी नवनवीन फिचर्सची उत्पादने मिळत असतात.
दरम्यान Apple कंपनी भारतात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. देशभरात apple कडून १० लाख रोजगाराच्या समर्थनात संधी देणार आहे
Apps आणि सप्लायर्स पार्टनरद्वारे रोजगाराची संधी देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या व्हाईस चेअरमन प्रिया बालसुब्रमण्यम यांनी आज (दि.१८) एका कार्यक्रमादरम्यान दिली.
बंगळुरू येथे टेक समिट २०२१ परिषद घेण्यात आली यावेळी कंपनीच्या प्रिया बालसुब्रमण्यम म्हणाल्या की, Apple कंपनी मागच्या वीस वर्षापासून सेवा देत आहे.
२०१७ पासून Apple कंपनी i phone चे उत्पादन भारतातील बंगळुरू येथे सुरू केले. त्यावेळीपासून आम्ही चेन्नई आणि अन्य भागात विस्तार करण्याचा विचार करत आहे.
भारतात apple कंपनीला मिळणारा प्रतिसाद पाहता देशातंर्गत बाजारात आणि देशाबाहेर निर्यात करण्यासाठी आयफोन्सची निर्मिती केली जात आहे.
पुरवठादारांच्या साखळी सोबत भारतात आमची कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात तयारीत आहे.
भारतातील ग्रामीण भागापर्यंत आम्हाला लवकर पोहोचायचं असल्याचे बालसुब्रमण्यम म्हणाल्या.
२०१७ पासून भारतात आयफोनची उत्पादने बनवत आहेत. iPhone 11, i phone 12 आणि i phone SE हे नवीन मॉडेल्स भारतात बनवले जातात. २०२० सालापासून भारतात ऑनलाईन स्टोअर ओपन केले आहे.
कस्टमर्सना उत्पादन कशाप्रकारे पोहोचतील याची व्यवस्था कंपनीकडून करण्यात आली होती.
दरम्यान कंपनी थेट ग्राहकांसाठी रिटेलमध्ये विस्तार करणार आहे.
अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये ७४ टक्के शेअर्ससह कंपनीनीने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
iPhone 12 आणि iPhone 11 यांच्या मागणीमुळे कंपनीची वेगाने प्रगती झाली.
Apple पहिल्यांदाच प्रिमियम सेगमेंटमध्ये टॉप ५ जी स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअर रिएलिटी, ३ डी प्रिटिंगसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात बदल होत आहेत. काही जण याला चौथी औद्योगिक क्रांती म्हणतात.