Amazon 30000 Job Cut: अमेझॉन ही जगातील सर्वात मोठी लॉजेस्टिक कंपनी पुढच्या आठवड्यात तब्बल १४ हजार कॉर्पोरेट जॉब कमी करण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिले आहे. एवढंच नाही तर ही कर्मचारी कपात मोठ्या ३० हजार व्हाईट कॉलर जॉब्स कटचाच एक भाग असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
ही कर्मचारी कपात २७ जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अमेझॉनची १० टक्के कॉर्पोरेट वर्कफोर्स प्रभावित होणार आहे. हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी अमेझॉनचे जगभरात जवळपास १० लाखांंच्या वर कर्मचारी आहेत. यातील बरेच कर्मचारी हे फुलफिलमेंट सेंटर आणि वेअर हाऊसमध्ये काम करतात.
अमेझॉनची ही कर्मचारी कपात सुरूवातीला कॉर्पोरेट आणि व्हाईट कॉलर जॉब्सना प्रभावित करणार आहे. यात अमेझॉन वेब सर्व्हिस, रिटेल आणि इ कॉमर्स ऑपरेशन, प्राईम व्हिडिओ एन्टरटेनमेंट, एचआर यांचा समावेश असणार आहे.
अमेझॉनची सेंट्रल रिस्ट्रक्चर मोहीम सुरू झाल्यावर ही दुसरी मोठी कर्मचारी कपात असणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेझॉनने जवळपास १४ हजार व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांची कपात केली होती. ही टोटल टार्गेटच्या अर्धीच होती. यातील जवळपास २२०० कर्मचारी हे फक्त सिएटल आणि बेलेव्ह्यू मधील होते.
एका अज्ञात कर्मचाऱ्याने ब्लिंड्स आणि रेड्डीटवर वरिष्ठ नेतृत्वानं या कर्मचारी कपातीबाबत आधीच कल्पना दिली होती. याचबरोबर जे परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅनमध्ये आहेत त्यांना आगाऊ नोटीस देण्यात आली होती.
अमेझॉन सीईओ अँडी जेस्सी यांनी यापूर्वीच सांगितलं होतं की ही कर्मचारी कपात ही फक्त आर्थिक उद्येशाने किंवा AI मुळे देखील करण्यात आलेली नाही. त्यांनी अमेझॉनमधील कंपनी कल्चरमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेझॉनमध्ये अधिकारी वर्गाची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाली होती. ते म्हणाले होते की, 'आम्ही आधी होते त्यापेक्षा जास्त लोक घेतले. त्यामुळे अधिकारी वर्गाचे अनेक स्तर निर्माण झाले होते.'