डॉन २ नंतर शाहरुखसोबत फरहान अख्तरचा नवा चित्रपट  Twitter
entertainment

डॉन २ नंतर शाहरुखसोबत फरहान अख्तरची पुन्हा हातमिळवणी

स्वालिया न. शिकलगार

डॉन २ नंतर फरहान अख्तर शाहरुख खानसोबत नवा चित्रपट घेऊन येणार आहे. डॉन २ मध्ये दोघे दिसले होते

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दिग्दर्शक फरहान अख्तर दोघे चित्रपट डॉन २ मध्ये दिसले होते. त्यानंतर दोघांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. आता शाहरुख खान आणि फरहान अख्तर यांच्यामध्ये डॉन ३ विषयी बातचीत झाली होती. पण, शाहरुख खानने चित्रपट नाकारला आणि रणवीर सिंहच्या झोळीत डॉन ३ चित्रपट पडला. आता शाहरुख-फरहान अख्तर पुन्हा एकत्र नव्या चित्रपटात दिसतील.

मीडिया रिपोर्टनुसार, एका फॅनने फरहानला विचारलं की, फरहान भविष्यात शाहरुख खानसोबत काम करेल. तेव्हा फरहान म्हणाला, हो. नक्कीच. आम्ही असं काही तरी शोधू ज्यावर आम्ही काम करू. एकत्र, आणि मला विश्वास आहे की, आम्ही असं करू.

'डॉन ३' चा फर्स्ट-लूक टीझर ऑगस्ट २०२३ मध्ये जारी करण्यात आलं होतं. यामध्ये रणवीर सिंह होता. डॅपर लूकमध्ये तो दिसला होता. टीझरच्या टॅगलाईनमध्ये लिहिलं होतं- 'एका नव्या युगाची सुरुवात.' या ॲक्शन थ्रिलरमध्ये कियारा आडवाणी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT