मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध अभिनेत्री बेगम फारुख जाफर ( Begum Farrukh Jaffar ) यांचे ब्रेन स्ट्रोक आल्याने निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. याबाबतची माहिती बेगम फारुख जाफर यांचे नातू शाज अहमद याने दिली आहे.
तब्येत बिघडल्याने आजीला ५ ऑक्टोबर रोजी लखनौच्या सहारा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी तिला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे सांगितले, अशी माहिती शाज अहमद याने दिली हाेती. उपचार सुरु असताना Begum Farrukh Jaffar यांचा मृत्यू झाला.
बेगम फारुख जाफर यांचे यांचे शुक्रवारी लखनाै येथील गोमतीनगरच्या निवासस्थानी निधन झाल्याची माहिती त्याने दिली. या घटनेची माहिती जुही चतुर्वेदीने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून दिली. 'बेगम फारुख जाफर जी, तुझ्यासारखे प्रेमळ कोणीही असू शकत नाही. तुमच्या जाण्याने खूपच दु:ख झाले आहे. RIP #FarrukhJafar'. अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बेगम फारुख जाफर यांनी रेडिओमध्ये निवेदिका म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर बेगम जाफरने यांनी 'उमराव जान' चित्रपटात रेखाच्या आईची भूमिका साकारली होती. 'स्वदेश', 'सुलतान', 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'पीपली लाईव्ह' यासह अनेक चित्रपटांत काम केले हाेते.
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 'गुलाबो सीताबो' या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या. या चित्रपटात त्यांनी फातिमा बेगमची भूमिका साकारली होती.
हेही वाचलं का?