सातारा : पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अश्या वक्तव्याची अपेक्षा नाही. अशा प्रकरचं वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदार किंवा त्यांच्या नेत्याने केलं असतं तर त्यांचीही बुद्धीही नॅनो आहे; पण पग्रल्भ असे राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ भूषविणार्या देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट राजकारणात प्रदीर्घ असा विराट मोर्चा दिसला नसेल, अनुभवला नसेल तर नक्कीच त्यांची बुद्धी 'नॅनो' आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ( Fadnavis vs Raut) आज केली.
वारंवार महापुरूषांच्या होणाऱ्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने काल (दि.१८) मुंबईत महामोर्चा काढला होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांनी एकत्र येत 'महामोर्चा' काढला. त्यानंतर देवंद्र फडणवीसांनी टीका केली की, "महाविकास आघाडीचा महामोर्चा अयशस्वी ठरलाय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे महाविकास आघाडीचा हा मोर्चाही नॅनो होता".
फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ते म्हणाले की," देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अश्या वक्तव्याची अपेक्षा नाही. अशा प्रकरचं वक्तव्य जर का शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदार त्यांच्या नेत्याने केलं असेल त्यांचीही बुद्धीही नॅनो आहे. पण पग्रल्भ असे राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षात पर्दीर्घ काळ करणाऱ्या देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट राजकारणात प्रदिर्घ असं विराट मोर्चा दिसला नसेल, अनुभवला नसेल तर नक्कीच त्यांची बुद्धी नॅनो आहे.
"मधल्या काळात फडणवीस दिल्लीला गेलेले होते. त्यावेळी त्यांना गुंगीचे औषद दिलेल दिसत. अजून त्याची गुंगी उतरलेली दिसत नाही. शनिवारी काढलेल्या मोर्चाचे देवेंद्र फडणवीस यांनी किमान स्वागत करायला हवं होतं, स्वत: मोर्चाला सामोरे जायला हवं होत. ती महाराष्ट्राची परंपरा आहे, असेही राऊत म्हणाले.
कालचा मोर्चा सरकारविरोधात होता का? आम्ही अस मानत नाही. हा आपल्या मुळात हा मोर्चा राजकारणासाठी नव्हता हा मोर्चा महापुरुषांसाठी होता. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात होता. हा विराट मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. या सगळ्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्र प्रेमी कालच्या विराट मोर्चात एकटवली. तुम्ही त्यांना या पद्धतीने अशी भाषा वापरता हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याच लक्षण नाही.
टीका ही लोकशाहीत होतच असते. सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधारींवर टीका करत. पण कालचा मोर्चा दिसला नाही. शिवसेनाप्रमुख यांच्या शब्दात सांगायच तर त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्रद्वेष आहे आणि असा पराकोटीचा महाराष्ट्र द्वेष महाराष्ट्राच्या ७० वर्षात पाहिलं नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :