Latest

Eyecare : ऐन लग्नाच्या सिझनमध्ये डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे व सुजलेल्या डोळ्यांपासून मुक्त होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : Eyecare : सध्या कडाक्याची थंडी आहे आणि लग्नाचादेखील हंगाम आहे. तेव्हा आपण तजेल आणि सुंदर दिसावे असे वाटते. परंतु आपण करीत असलेले शारीरिक कष्ट, अवेळी खााणे, रात्री उशिरापर्यंत जागरण, आणि त्यामुळे होणारी दगदग. यामुळे चेहऱ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. डाग किंवा चट्टे लपवून चांगला मेकअप केल्याने तुम्ही सुंदर दिसालही. पण निरोगी दिसणारी आणि नैसर्गिकरित्या तेजस्वी त्वचा कायमस्वरूपी उजळ आणि चांगली दिसते. (Eyecare)

Eyecare :  डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही त्वचेची एक समस्या आहे आणि काळी वर्तुळे वाढण्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात चेहऱ्याची अनुवांशिक वैशिष्ट्ये, ऍलर्जी, तणाव, डोळ्यांचा थकवा असतात. ज्यामुळे तुम्ही थकलेले दिसता. या समस्या दूर करण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

Eyecare : पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा फिकट दिसू शकते, ज्यामुळे काळी वर्तुळे अधिक स्पष्ट होतात. (Eye care) कारण काहीही असो, डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यात मदत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे पुरेशी झोप घेणे. झोपेमुळे केवळ डोळे उजळण्यास मदत होत नाही. हे तुमच्या शरीराला व त्वचेला होणाऱ्या पेशींचे नुकसान भरून काढण्यास मदत करते.

Eyecare : पौष्टिक आहार घ्या

तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए,बी,सी,डी आणि ई युक्त समृद्ध अन्नाचा समावेश केल्यास काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ: टरबूज, टोमॅटो, बेरी, ताज्या हिरव्या भाज्या, ब्रोकोली, राजमा आणि काकडी. तसेच, कमी सोडियमयुक्त आहार घेण्याचा प्रयत्न करा.

Eyecare : हायड्रेटेड रहा

अल्कोहोल आणि मीठ कमी करा, कारण या दोन्हीमुळे तुमची त्वचा डीहायड्रेटेड होऊ शकते किंवा डोळ्यांना सूज येऊ शकते.  दिवसभरात किमान २ लिटर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने काळी वर्तुळे आणि फुगलेले डोळ्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

Eyecare : ओलावा

डोळ्यांखालील मास्क किंवा हायड्रेटिंग अंडर-आय जेल सीरमसह डोळ्याच्या भागाला चांगले मॉइश्चराइज करा. डोळ्यांखालील जेल सीरम असे निवडा जे काळी वर्तुळे, फुगलेले डोळे, आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तयार केले जाते, त्याच वेळी तुमच्या डोळ्याभोवतीची त्वचा मजबूत, गुळगुळीत आणि उजळ करण्यास मदत होते.

Eyecare : सनस्क्रीन

सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांखालील त्वचा कमकुवत होऊ शकते. ज्यामुळे काळी वर्तुळे आणि सूज येऊ शकते. तुमच्या डोळ्यांच्या आसपासच्या नाजूक त्वचेचे तसेच तुमच्या शरीराच्या इतर भागाचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सनस्क्रीन लावा. तुम्ही अतिरिक्त संरक्षणासाठी सनग्लासेसदेखील वापरू शकता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT