डोळ्यातील ओलावा कमी झाल्यास… | पुढारी

डोळ्यातील ओलावा कमी झाल्यास...

मोबाईल, टीव्ही, आयपॅड यांचा अतिरेकी वापर केल्याने आणि एकटक स्क्रीनकडे पहात राहिल्याने डोळ्यावर ताण येतो. परिणामी डोळ्यातील पाणी सुकते आहे. मोबाईल आणि लॅपटॉप हे अवघटक आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करत आहेत. सतत स्क्रीनकडे पाहात राहिल्याने डोळ्यातील पाणी सुकते आहे. लॅपटॉप आणि मोबाईलवर खूप जास्त वेळ काम केल्याने डोळ्यातील रेटिनावर थेट प्रभाव पडतो. डोळ्यात तयार होणारा पातळ पदार्थ पापण्या न मिटल्याने डोळ्यांवर पसरू शकत नाही. त्यामुळे डोळे कोरडे होतात, डोकेदुखी, डोके जड होणे आणि भीती वाटते.

सर्वसाधारणपणे एक मिनिटात 15 वेळा डोळे उघडझाप केले पाहिजेत, पण मोबाईल किंवा लॅपटॉप पाहताना आपण व्हिडीओ किंवा काही चलतचित्र पाहताना केवळ 5 वेळाच डोळ्यांची उघडझाप करतो. त्यामुळे डोळ्यातील पाणी उडून जाते. कारण आपण जेव्हा डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा डोळ्यातील हे पाणी संपूर्ण डोळ्यावर पसरते. पण पापण्या न मिटल्यामुळे डोळ्यातील पाणी न पसरल्याने ते सुकते. हल्ली तर मुलांमध्येही डोळे रूक्ष होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. कारण हल्ली लहान मुलांच्या हातातही मोबाईल दिला जातो आणि ते तासनतास त्यात रमलेली असतात.

कशी दूर करावी समस्या?

कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्ही किंवा टॅबलेटचा वापर करताना दर 5 सेकंदाला एकदा तरी डोळ्यांची उघडझाप करावी.
ओलसरपणा कायम रहावा यासाठी डोळ्यात औषध घालावे ज्यामुळे डोळ्यांचा ओलावा टिकून राहील.
काँटॅक्ट लेन्स स्वच्छ ठेवावी आणि त्या कायमच घालाव्या.
डोळ्यांना थेट वारे लागू नये असा प्रयत्न करावा.
अख्खे धान्य, फळे- भाज्या जास्त प्रमाणात खावेत आणि साखर कमी खावी.
डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कोणतेही औषधे घालू नये.
डोळ्यात घालण्याचे औषध हे वापरायला सुरुवात केल्यानंतर महिनाभरात संपवावे किंवा न संपल्यास त्याचा वापर करू नये.

– डॉ. भारत लुणावत

Back to top button