पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 7 ते 16 जून दरम्यान नियमित शुल्कासह तर 17 जून ते 21 जून दरम्यान विलंब शुल्कासह भरण्याची संधी देण्यात आली होती; परंतु, त्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह 17 ते 21 जून तर विलंब शुल्कासह 22 जून ते 25 जून दरम्यान विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी 17 ते 25 जून या कालावधीत अर्ज भरत असतानाच 8 ते 26 जून या कालावधीत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरता येणार आहे. तर 27 जूनला माध्यमिक शाळांमार्फत बँकेत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळात जमा करायच्या आहेत. ऑनलाइन अर्जात मार्च-एप्रिल 2023 मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती प्रवेश अर्जात घेता येईल. श्रेणीसुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2023 आणि फेब—ुवारी-मार्च 2024 या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा :