नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या सुमारे 900 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. 3 ऑक्टोबरपासून ही परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी आयबीपीएस कंपनीने तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात आले होते. त्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना एक हजार; तर मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले. या कालावधीत जिल्हाभरातून 60 हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या उमेदवारांना परीक्षा तारखेची प्रतीक्षा होती. अखेर आयबीपीएस या कंपनीने नुकतीच परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
या पदांच्या परीक्षा दुसर्या टप्प्यात!
ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांच्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही.
पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक
3 ऑक्टोबर ः कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता
5 ऑक्टोबर ः पशुसंवर्धन पर्यवेक्षक
7 ऑक्टोबर ः वरिष्ठ सहायक
8 ऑक्टोबर ः विस्तार अधिकारी सांख्यिकी
10 ऑक्टोबर ः विस्तार अधिकारी कृषी
11 ऑक्टोबर ः लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा
हेही वाचा :