हुपरी : अमजद नदाफ
'कोरोना'मुळे सरकार लॉकडाऊन करेल का, याची चिंता राज्यातील जनतेला लागली आहे. असे असतानाच निवडणुका झाल्यावरच 'कोरोना' कसा फोफावतो याचे कोडे लोकांना पडले आहे. सोशल मीडियावर कोरोना कोणाला घाबरतो, याचा एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोना आणि राजकारण याचा काही संबध आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना निवडणुका झाल्यावरच कसा फोफावतो, असा प्रश्न विचारला जात आहे. पुणे बँकेच्या निवडणुका झाल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. मुंबईचीदेखील तीच अवस्था. कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्याने आता जिल्ह्यात काय होणार याची चिंता लागली आहे.
नेमका कोरोना कोणाला घाबरतो असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत प्रतिकात्मक कोरोनाला संबंधित व्यक्ती मास्क, सॅनिटायझर, व्हॅक्सिनही दाखवतो. मात्र त्यालाही कोरोना घाबरत नाही. मात्र, निवडणुका असलेला फलक दाखवल्यवर कोरोना पळून जातो असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे लोकांच्यात कोरोना विषयी असलेली संभ्रमवस्था कायम आहे. राजकीय मंडळी याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.