जालना; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील रोहिलागड गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. (Maratha Reservation)
आमदार नारायण कुचे आज (दि.२) विविध विकासकामांच्या उद्घाटनाला गेले होते. त्यावेळी गावातील मराठा समाजातील युवकांनी आ. नारायण कुचे यांना गावातून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर आ. नारायण कुचे यांनी गावातून काढता पाय घेत गावातून निघून गेले. यावेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. (Maratha Reservation)
हेही वाचा :