पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकातील १३ वा सामना अफगानिस्तान विरूध्द इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येत आहे, या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज सँम करन याने शानदार कामगिरीमुळे इंग्लडने ११२ धावांवर अफगानिस्तानचा डाव गुंडाळला.
वेगवान गोलंदाजांसाठी चांगली असलेल्या खेळपट्टीवर जॉस बटलरने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे इंग्लंडच्या गोलंदाजांनी सिध्द केले. त्यांनी अफगानी संघाला ११२ धावांवर गारद केले. सुरूवातीपासून अफगानिस्तानच्या फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी करण्यास सुरूवात केली. परंतु, फलंदाजांना मोठी खेळी किंवा भागीदारी करण्यात यश आले नाही.
अफगाणिस्तानकडून इब्राहीन झादरान आणि उस्मान घानी मैदानावर उभे राहून संघाला ११२ धावांपर्यंत पोहचावले. झादरानने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या. तर, उस्मान गाझीने ३० चेंडूत ३० धावा केल्या. गोलंदाजीत इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक ५ गडी बाद करत अफगानिस्तानचा डावाला खिंडार पाडण्यात मोलाची कामगिी केली, त्याने ३.४ षटकांत १० धावा देत अफगानिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यावेळी गोलंदाजी त्याला मार्क वूड आणि बेन स्टोक्स चांगली साथ दिली. यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा;