पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्ट विंडोज ७ आणि ८.१ ची वाढवण्यात आलेली सेक्युरिटी अपडेटची सुविधा आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महत्त्वाचे सिक्युरिटी अपडेट मिळणे बंद होणार आहे. या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमसाठी मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft ) सपोर्ट बंद झाल्याने ही ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्या युजर्सना विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागणार आहे.
मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ आणि ८.१साठीचा सपोर्ट जानेवारी २०२०मध्ये बंद केला होता. पण जे ग्राहक एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेटची सुविधा घेतील त्यांच्यासाठी या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट २ वर्षं सुरू ठेवण्यात आली. ( Microsoft ) पण, एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेटची सुविधा आजपासून बंद होत आहे. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्या ग्राहकांना आता विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टम विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
विंडोज ७ असलेले काँप्युटर विंडोज ११साठी पुरक नसतील. विंडोज ७चे काँप्युटर विंडोज १० साठी अपग्रेड होतील, त्यामुळे विंडोज १०चे पूर्ण व्हर्जन विकत घेऊन ते इन्स्टॉल करावेत, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
हेही वाचा;