पुढारी ऑनलाईन : टेसला आणि ट्विटरनंतर एलॉन मस्क यांनी आता आर्टिफिशियल तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन स्टार्ट अपची सुरुवात केली आहे. 'xAI' असं मस्क यांच्या नवीन स्टार्ट अपच नाव आहे. या संदर्भात ट्वीट करत त्यांनी नवीन स्टार्टअपची घोषणा केली. यामध्ये 'xAI' या कंपनीचे कार्यक्षेत्र मस्क यांच्या इतर कंपन्यांपेक्षा वेगळी असली तरी त्याच्यापासून या इतर कंपन्यांना अनेक फायदे मिळतील. हे स्टार्ट अप AI ला अधिकाधिक वास्तवतेशी जोडणार असेल हे देखील मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
'ब्रम्हांडच्या प्रकृतीबाबत अधिक जाणून घेणं' हा या नव्या स्टार्टअप मागचा हेतु असल्याचही मस्क यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यात OpenAI, Google DeepMind, Tesla या कंपन्यांमधील काही तज्ञही या कंपनीचा हिस्सा असल्याचं समोर येत आहे. एलॉन मस्क या कंपनीचे डायरेक्टर असतील तर Jared Birchal या फर्मच्या सेक्रेटरीपदी असतील.
एलॉन मस्क हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेबाबत कायमच इशारा देत आले आहेत. 'मानवी अस्तित्वासाठी मोठं आव्हान' या शब्दांत त्यांनी AI ची समीक्षा केली होती. आता त्याच्या अगदी विपरीत म्हणजेच AI शीच जोडलं जाण्याच्या एलॉन मस्क यांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे ही वाचा :