Electronic Tattoo 
Latest

Electronic Tattoo : स्‍मार्टफोन २०३० पर्यंत बंद होणार! बिल गेट्स यांचे भाकित

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : तंत्रज्ञानाच्या (Electronic Tattoo) जगात वेगाने बदल हाेत आहेत. आज येणाऱ्या तंत्रज्ञानात अवघ्या काही तासांत बदलते. अगदी अलीकडच्या काळात आपल्या मोबाईलमध्ये नवीन फीचर असणे ही मोठी गोष्ट होती. आज आपण आपल्या आजुबाजूला पाहिल् तर लक्षात येईल बऱ्याच जणांच्या हातात स्मार्टफोन पाहिला मिळेल.  जग 2G, 3G आणि 4G वरून आता 5G कडे झेपावले आहे. लवकरच काही देश  6G लाँच करण्याच्या तयारीत आहेत. नुकतचं बिल गेट्स स्मार्टफोन येत्या काळात नसतील.असा दावा केला आहे. जाणून घेवूया नेमकं काय आहे प्रकरण
स्मार्टफोन मध्ये सतत काहीना काही बदल होत आहेत. ते दिवसेंदिवस हायटेक होत आहेत. मोबाईल वायरलेस चार्जिंग, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या जगात आणखी एका तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक टॅटूची. या  इलेक्ट्रॉनिक टॅटूमुळे आगामी काळात स्मार्टफोनचे अस्तित्व पृथ्वीवरून नाहीसे होणार आहे.

पृथ्वीवरुन स्मार्टफोन संपणार!

पृथ्वीवरुन स्मार्टफोन संपणार! स्मार्टफोन धारकांना धक्का बसेल; पण तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. पृथ्वीवरुन स्मार्टफोन संपणार, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी केला आहे. त्यांनी येत्या काळात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या  स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू (Electronic Tattoo) घेतील. असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Electronic Tattoo : काय आहे इलेक्ट्रॉनिक टॅटू?

स्मार्टफोन पृथ्वीवरुन संपणार; मग याची जागा कोण घेणार? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर याची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेणार आहे. इलेक्ट्रॉनिक टॅटू ही एक प्रकारची चिप आहे. ही चिप मानवी शरीरात सहजपणे बसवता येते. जी दिसायला टॅटूसारखी असेल. ही इलेक्ट्रॉनिक चिप स्मार्टफोनची ज्या गोष्टी करणार आहे. त्या सर्व गोष्टी करू शकणार आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक चिप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्मार्टफोनची गरज भासणार नाही. बिल गेट्स यांच्या या दाव्यावर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांत तुम्हाला स्मार्टफोन खिशात घेऊन फिरावे लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक टॅटूच्या मदतीने एक व्यक्ती संपूर्ण जगाशी जोडली जाईल.

2030 पर्यंत स्मार्टफोन नसणार

स्मार्यफोन 2030 पृथ्वीतलावरुन असणार नाही, असा दावा करणारे बिल गेट्स हे पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही असा दावा केला होता. 2030 पर्यंत स्मार्टफोनचे जग बदलणार. ते म्हणाले होते की, 2030 पर्यंत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात  बदल होणार. उदी स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे वापरता येतील. पेक्काच्या मते, चिपसेट टॅटू 2030 पर्यंत थेट मानवी शरीरात समाविष्ट केले जाऊ शकतात.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT