(Eknath Shinde's Tweet) 
Latest

Eknath Shinde’s Tweet : बीकेसी मैदानावरील दसरा मेळव्‍यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक ट्वीट

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीकेसी मैदानावरील सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे.  एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार असल्याचे म्हटले आहे. (Eknath Shinde's Tweet)

" मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे " असे ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच विकासाच्या यात्रेत देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार महत्त्‍वाचे आहेत. माय-बाप जनतेचे कल्याण साध्य करण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी बीकेसीच्या मैदानावर उपस्थित रहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Eknath Shinde's Tweet)

मुंबईत प्रथमच दोन मैदानांवर दोन सेनांचे दोन दसरा मेळावे

शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवसेनेचा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होत आहे. बीकेसी मैदानाची आसनक्षमता एक ते सव्वा लाख असली तरी शिंदे गटाने किमान 5 लाख कार्यकर्ते मुंबईत धडकतील इतक्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. शिवाजी पार्कची बैठक क्षमता 80 हजार ते 1 लाख असली तरी तिथेही मैदान ओसंडून गर्दी उरेल अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनीही शक्य तितक्या गाड्या बुक करून शिवसैनिकांच्या प्रवासाची सोय केली आहे, तर मुंबईत या शिवसैनिकांसाठी सोयी-सुविधांची जय्यत तयारी शिवसेनेच्या शाखांनी केलेली दिसते. (Eknath Shinde's Tweet)

उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना साद घालत मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खास निमंत्रण आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करून ते व्हायरल केले आहे. एकूण तयारी पाहता शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही मैदानांवरील दसरा मेळावे दणदणीत होण्याची चिन्हे आहेत. आता महाराष्ट्राचे लक्ष आहे ते ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणांकडे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करत भाजपसह सत्तांतर घडवले आणि त्यात शिवसेनेची दोन शकले उडाली. गेले चार महिने हे दोन्ही गट एकमेकांवर सतत तुटून पडत असताना आता दसरा मेळाव्यातील भाषणात कोणती नवी हत्यारे उपसली जातात, याबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल आहे. (Eknath Shinde's Tweet)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT