अयोध्या, पुढारी ऑनलाईन : हिंदुत्व जर सगळ्यांच्या घरात पोहोचले. तर त्यांचे कायमस्वरुपी दुकान बंद होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काही लोक मुद्दाम आणि जाणीवपूर्वक पद्धतीने परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हा एकप्रकारे देशद्रोह आहे, असा संताप मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर अयोध्येतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आम्ही अयोध्या यात्रेचे राजकरण करीत नसून राम हे आमचे श्रद्धास्थान आहे, आत्मीयता आहे. पूर्वी मी अयोध्येला नियोजन करण्यासाठी आलो होतो. पण आता माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मुख्यमंत्री योगी सरकारने नियोजन केले आहे. भाजपसोबत गेल्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. आजची यात्रा आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. काही जण हिंदुत्वाला बदनाम करीत आहेत, सावकारांचा अपमान करीत आहेत. हिंदुत्व घराघरात पोहोचले, तर त्यांचे दुकान बंद होईल. ४०० वरून ४० वर आले आहेत, असाही टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
२०१९ मध्ये स्थापन झालेले सरकार हेच रावणराज होते. कुठलेही वचन न देता प्रभूरामाने वडिलांच्या वचनासाठी वनवास भोगला. तर दुसरीकडे सत्तेच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचार विसरून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली, अशी टीका उध्दव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी केली. पालघर येथील साधूंची हत्या, पत्रकार अटक हे राम राज्य का? अयोध्या यात्रेला फालतुगिरी म्हणणाऱ्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना जनता उत्तर देईल. सर्व सचिव तसेच शासकीय यंत्रणेला सूचना देऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही, असे चोख उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.
हेही वाचा