File Photo  
Latest

Niti Aayog meeting | ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या ८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक (niti aayog meeting today) होत आहे. या बैठकीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. पण ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), भगवंत मान (पंजाब), नितीश कुमार (बिहार), के. चंद्रशेखर राव (तेलंगणा), एम. के. स्टॅलिन (तामिळनाडू), अशोक गेहलोत (राजस्थान) आणि पिनाराई विजयन (केरळ) हे या बैठकीत सहभागी झालेले नाहीत.

प्रगती मैदानात नव्याने बांधण्यात आलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक सुरू आहे. ही बैठक "Viksit Bharat @2047: Role of Team India" या थीमखाली आयोजित करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल आणि नरेंद्र सिंह तोमर आदी केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित राहिले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू, भूपेश बघेल (छत्तीसगड), योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश), पुष्कर सिंह धामी (उत्तराखंड), पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश), माणिक साहा (त्रिपुरा), मनोहर लाल खट्टर (हरियाणा), भूपेंद्र पटेल (गुजरात), प्रमोद सावंत (गोवा), कॉनराड संगमा (मेघालय), एकनाथ शिंदे (महाराष्ट्र), हेमंत सोरेन (झारखंड) आणि वायएस जगन मोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) हे या बैठकीत सहभागी झाले आहेत. (Niti Aayog meeting)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी नवीन संसद भवन वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील. पण जवळपास २१ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. तर, २५ पक्षांनी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे. १० डिसेंबर २०२० मध्ये नवीन संसद बांधकामाचा पंतप्रधानांनी शिलान्यास केला होता. १२०० कोटींचा निधी या भव्य वास्तू उभारण्यावर खर्च करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT