'पढोगे लिखोगे तो बनोगे नबाब ।
खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब ।'
अशी एक म्हण हिंदी/उर्दूमध्ये प्रचलित आहे. पण हा प्रघात आता मागे पडला. खेळातही करिअर करता येते आणि यशस्वी होता येते हे आता खेळाडूंनी दाखवून दिले आहे. पूर्वीचे क्रिकेटपटू (Education of Cricketers) वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करायचे. पण आता आपले क्रिकेटपटू हे जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत झळकतात. यशाच्या शिखरावर पोहोचलेले हे शिकले किती? याची माहिती घेतली तर आश्चर्यकारक गोष्टी पुढे आल्या. (Education of Cricketers)
रोहित शर्मा : 2007 साली भारताला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात मोठा वाटा असणार्या रोहितने फक्त 12 वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड झाल्यावर त्याने पुस्तक हातात घेतले नाही.
विराट कोहली : भारतीय क्रिकेट विश्वातील आणि जाहिरातीमधील ब्रँड असणार्या विराट कोहलीनेही बारावीच्या पुढे शिक्षणाला रामराम केला. नवी दिल्लीच्या भारती पब्लिक स्कूलमध्ये 12 वीत असताना त्याचे अंडर-19 क्रिकेटसाठी सिलेक्शन झाले होते.
महेंद्रसिंग धोनी : आपल्या मुलाने शिक्षण पूर्ण करावे, आणि रेल्वेची नोकरी करावी, अशी अपेक्षा असणार्या पानसिंग धोनी यांच्या मुलाने म्हणजेच महेंद्रसिंग धोनीने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले होते; परंतु क्रिकेटच्या प्रेमाने त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. 2011 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर मात्र त्याने बी.कॉम.ची पदवी मिळवली.
हार्दिक पंड्या : सामने खेळायला दुसर्या गावात जायला सायकलही नसणार्या हार्दिक पंड्याजवळ आज बंगला है.. गाडी है… बँक बॅलन्स है…. नाही ती फक्त डिग्री. आज फाडफाड इंग्लिश बोलणारा हार्दिक चक्क नववी नापास आहे. क्रिकेट की शिक्षण? असा प्रश्न त्याच्यापुढे आला तेव्हा त्याने शाळेकडे पाठ केली.
सचिन तेंडुलकर : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर अशा अनेक उपाध्या आपल्या नावापुढे लावणारा, क्रिकेटमधील कित्येक विक्रम त्याच्या नावावर नोेंदले आहेत, असा सचिन तेंडुलकर शिक्षणात मात्र पदवी मिळवू शकला नाही. बोर्डाच्या परीक्षेत तो नापास झाला; परंतु आज त्याच्या नावाचा धडा विद्यार्थ्यांना शिकवला जातो. कर्तृत्व म्हणतात ते हेच.
हे ही वाचा…