पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आयएलएफएस' प्रकरणी तब्बल ९ तास ईडीने राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चौकशी केली. ईडी कार्यालयातून बाहेर पडून जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, ९ तास चौकशी केल्यानंतर ईडीकडे माझ्याविषयी कोणतेच प्रश्न शिल्लक राहिले नसतील अशी मला आशा आहे. या चौकशी दरम्यान माझं अर्ध पुस्तक वाचून झालं असा ही टोमणा ही त्यांनी यावेळी लगावला. (Jayant Patil ED Enquiry)
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज, सोमवारी (दि. 22) 'आयएलएफएस' प्रकरणी ईडीने सलग ९ तास चौकशी केली. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी रात्री ९.१५ पर्यंत चौकशी सुरु होती. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करायचे ठरवले होते. त्यांनी मला जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरे दिली आहेत. मला वाटते की, मी त्यांना समाधान कारक उत्तरे दिली आहेत आणि त्यांचे समाधान झाले आहे असे मला वाटते. या चौकशी दरम्यान माझे अर्ध पुस्तक वाचून झाले असे म्हणत जयंत पाटील म्हणाले, आता त्यांच्याकडे कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील पण, ते जेव्हा मला पुन्हा बोलावतील तेव्हा मी परत येईन असे मी त्यांना सांगितले आहे. (Jayant Patil ED Enquiry)
आयएलएफएस कंपनीच्या व्यवहारांची 'ईडी'कडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश हाेता. कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा काही संदर्भ या नोटीसी मागे आहे का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरू आहे.
हेही वाचा