नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज पुन्हा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) समन्स बजावले.(ED Summons ) त्यांना २१ जुलै रोजी चौकशीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. (ED Summons ) डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्या ईडी चौकशीला सामोरे गेल्या नव्हत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस चौकशीसाठी हजर राहावे,असे ईडीने त्यावेळी म्हटलं होतं. त्यानुसार आता त्यांची नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिग प्रकरणी २१ जुलै रोजी चौकशी होणार आहे. दरम्यान,याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईडीने सलग पाच दिवस चौकशी केली होती.
हेही वाचा :