पुढारी ऑनलाईन डेस्क : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कोविड घोटाळा (BMC Covid scam) प्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुरज चव्हाण यांच्या घरी आज ईडीने छापा टाकला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ज्या-ज्या लोकांचे घोटाळ्याशी कनेक्शन असेल त्यांच्याकडेच ही छापेमारी चालली असेल. याबाबत अधिकृत माहिती ईडी देवू शकेल मला माहित नाही," असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुणे येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, "नेमकी काय कारवाई चालली आहे, हे माहित नाही. पण हे निश्चितपणे सांगतो की मुंबई महापालिकेत कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर घोटाळा बाहेर आला तेव्हा अतिशय धक्कादायक माहिती समोर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालू होती. या छाप्यामध्ये काय सुरू आहे हे ईडी सांगू शकेल मला माहित नाही. ज्या ज्या लोकांचे कनेक्शन असेल त्यांच्याकडे छापेमारी सुरू असेल याबाबत अधिकृत माहिती ईडी देवू शकेल माझ्याकडे माहिती नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी अभियंत्याच्या कानशिलात लगावली, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "लोकप्रतिनीधींनी संयम बाळगला पाहिजे. एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनीधींनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे."
हेही वाचा :