पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज ( दि. 22) 'आयएलएफएस' प्रकरणी ईडीने सलग ९ तास चौकशी केली. ( Jayant Patil ED Enquiry ) सोमवारी ( दि.२२) सकाळी १२.१५ वाजता जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर झाले. यानंतर रात्री ९.१५ पर्यंत चौकशी सुरु होती.
दरम्यान, जयंत पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी सध्या ठिकठिकाणी फलक उभारण्यात आले होते. तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली हाेती. (NCP leader Jayant Patil )
आयएलएफएस कंपनीच्या व्यवहारांची 'ईडी'कडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश हाेता. कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा काही संदर्भ या नोटीसी मागे आहे का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरू आहे.
हेही वाचा :