ईडी 
Latest

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीचे मुंबईतील जीटीएल कंपनीच्या ६ ठिकांणावर छापे

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) मुंबईतील पायाभूत सुविधा सेवा पुरवणारी कंपनी जीटीएल लिमिटेडच्या (GTL Ltd) ६ ठिकाणी बुधवारी छापे टाकले.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने GTL लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

कंपनीने २४ बँकांच्या कन्सोर्टियमकडून ४,७६० कोटी रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट सुविधा मिळवल्याचा आरोप त्यात आहे. त्यात lDBI ही आघाडीची बँक आहे. सीबीआयने एफआयआरमध्ये आरोप केला आहे की चुकीची माहिती देऊन कर्ज सुविधा मिळवल्या गेल्या.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT