नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय यांनी नागपुरात एका प्रसिद्ध सीएकडे छापेमारी केली आहे. आज सकाळी साडेसातच्या दरम्यान सीबीआय आणि ईडीचे पथक लावरेज ग्रिन सोसायटी नामक इमारतींमध्ये आले आणि थेट एका सीएच्या घरी जाऊन सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. (ED Raid Nagpur)
सीएच्या कार्यालयातील आणि निवासस्थानी त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबाशी संबधीत हे सीए असल्याची माहिती आहे.
देशमुख प्रकरणी मागील वर्षभरात सात ते आठ वेळा नागपुरात अंमलबजावणी संचालनालयाने आणि सीबीआयने ही छापेमारी केली आहे. (ED Raid Nagpur)
मात्र आता नेमकं काय नविन प्रकरण आहे या बद्दल सीबीआय किंवा अंमलबजावणी संचालनालयाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.