पुढारी ऑनलाईन : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) केंद्र सरकारला व्हॉट्सॲपवर 'विकसित भारत' मेसेज पाठवणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सॲपवर विकसित भारत मेसेज पाठवणे त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाकडून अनुपालन अहवाल तात्काळ मागवला होता. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (Lok Sabha elections 2024)
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊनही आणि आचारसंहिता लागू होऊनही नागरिकांच्या फोनवर असे संदेश पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला मिळाल्या होत्या. यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रतिसाद देत निवडणूक आयोगाला कळवले आहे कीआचारसंहिता लागू होण्यापूर्वी पत्रे पाठवली गेली असली तरी त्यातील काही नेटवर्क मर्यादांमुळे प्राप्तकर्त्यांना विलंबाने मिळाली असावीत.
लोकशाहीचे उगमस्थान तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी ७ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. यावेळी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे व १ जून असे मतदानाचे टप्पे असतील. महाराष्ट्रातील मतदान मात्र ५ टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे असे टप्पे असतील. सर्व टप्पे आटोपल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकाचवेळी ४ जून रोजी मतमोजणी होईल व निकाल लागेल. (Lok Sabha elections 2024)
हे ही वाचा :