पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake दिल्लीकरांची नवीन वर्षाची पहाट भूकंपाच्या धक्क्यांनी सुरू झाली. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 1 जानेवारीच्या पहाटे 1.19. मिनिटांनी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. 3.8 तीव्रतेचा हा भूकंप होता. याचे केंद्रस्थान हरियाणाच्या झज्जर येथे नोंदवले गेले, अशी माहिती भूकंप विज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्राकडून (National Center for Seismology) देण्यात आली आहे. एनसीएसने ट्विट करून याची माहिती दिली आहे.
Earthquake 31 डिसेंबरच्या रात्रीचे सेलिब्रेशन रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाच भूकंपाचे धक्के दिल्लीकरांना जाणवले. या भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे सांगण्यात आले आहे. सध्या तरी या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अन्य कोणतेही नुकसान झाल्याची सूचना नाही.Earthquake
हे ही वाचा :