सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरमध्ये देवीच्या मिरवणूकीमध्ये जनरेटरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ मुले गंभीर जखमी झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर शहरात देवीची मिरवणूक निघाली होती. यावेळी देवीच्या मुर्तीच्या पाटावर लहान मुले बसलेली होती. तसेच मिरवणूकीला मोठी गर्दी होती. यावेळी जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा स्फोट झाला. या घटनेत पाच ते सहा मुले गंभीर जखमी झाली. जखमींना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यातील काही जणांना पुणे येथे हलवण्यात आले आहे.
हेही वाचा :