कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी आक्रमक; निमशिरगाव येथे ट्रॅक्टर पेटवला | पुढारी

कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी आक्रमक; निमशिरगाव येथे ट्रॅक्टर पेटवला

जयसिंगपूर; संतोष बामणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.

चिपरी (ता. शिरोळ) येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली होती. मंगळवारी (दि. २४) संध्याकाळी निमशिरगाव (ता.शिरोळ) येथून ऊसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

सायंकाळी स्वाभिमानीच्या कार्यकर्यांनी ऊसाची वाहने अडवून ट्रॅक्टर चालकांना जा विचारला होता. त्याचबरोबर उसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडी होऊ देणार नाही व उसाची वाहतूक होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन स्वाभिमानीने उसाची वाहने रोखून धरली होती. अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी उसाची वाहने पेटवून दिल्याने, स्वाभिमानीच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. रात्री उशिरा उशिरापर्यंत आग लागलेले वाहने भिजवण्याचे काम सुरू होते.

Back to top button