Latest

Dunki vs Salaar : ‘सालार’ची ३०० कोटीकडे ‘झेप’; ‘डंकी’लाही भरभरुन प्रतिसाद

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रशांत नीलने दिग्दर्शित 'सालार' चित्रपटाची ३०० कोटीकडे झेप घेतली आहे. 'सालार'ने दुसऱ्या दिवशी २९५.७ कोटींची कमाई केली आहे.  दुसऱ्या दिवशी 'सालार'ने ५९.३२ कोटींची कमाई केली. दोन दिवसांचा विचार करता सालारने ३०० काेटीकडे झेप घेतली आहे. दरम्‍यान, राजकुमार हिरानी दिग्दर्शित केलेला आणि बॉलिवु़डचा किंग खान शाहरुख खानची मुख्य भुमिका असलेला 'डंकी'लाही चाहत्‍यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.   (Dunki vs Salaar)

सालार चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे.  प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि टीनू आनंद यासारखे स्टार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला. हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी पहाटेपासून थिअटरमध्ये गर्दी केली हाेती.

'डंकी'ला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम

राजकुमार हिरानी दिग्दर्शित केलेला आणि बॉलिवु़डचा किंग खान शाहरुख खानची मुख्य भुमिका असलेला 'डंकी'चा अद्याप डंका सुरु आहे. सलग सुट्ट्यांमुळे चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतचं आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनने दोन दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला आहे, अशी माहिती शाहरुख खानची कंपनी असलेल्या रेड चिली एंटरटेनमेंटने एका पोस्टद्वारे दिली आहे.

'डंकी' चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल यांनीही भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांच्यात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत होती. या चित्रपटाला आतापर्यंत संमिश्र असे  रिव्ह्यू मिळत आहेत.  मात्र, चाहत्यांकडून मिळणारा प्रेम कमी होत नाहीये. त्यामुळे 'डंकी'च्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनने दोन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे, अशी माहिती शाहरुख खानची कंपनी असलेल्या रेड चिली एंटरटेनमेंटने एका पोस्टद्वारे दिली आहे.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT