Dunki Movie  
Latest

Dunki Movie : शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानचे चालू वर्षात पठाण आणि जवान हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. दरम्यान, जवान आणि पठाणच्या यशानंतर शाहरुख खानचा डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या आसपास प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा कॉमेडी आणि ड्रामा असलेला डंकी भारतात २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आज (दि.२१) चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय रिलीज पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. 'डंकी' २१ डिसेंबरला परदेशात रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Dunki Movie)

डंकीचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला (Dunki Movie)

डंकी भारतात प्रदर्शित होण्याच्य एक दिवस आधी २१ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रदर्शित होईल. आज या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमध्ये आपण शाहरुख खानच्या पात्राची मागील बाजू पाहू शकतो जो सैनिकाच्या पोशाखात आहे. त्याच्या हातात बॅग आणि इतर सामानही आहे. त्याच्या समोर एक प्रचंड सपाट वाळवंट आहे. (Dunki Movie)

अभिनेत्री तापसी पन्नूचीही प्रमुख भूमिका (Dunki Movie)

शाहरुख खानने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत प्रथमच काम केले आहे. शिवाय या चित्रपटात तापसी पन्नूही प्रमुख भूमिकेत असेल. 'डंकी'ला जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी डंकीसाठी योगदान दिले आहे. शाहरुख आणि तापसी व्यतिरिक्त या चित्रपटात बोमन इराणी देखील आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. 'डंकी'चे शूटिंग लंडन, बुडापेस्ट, जेद्दाह आणि निओममध्ये झाले आहे. (Dunki Movie)

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT