Dua Lipa 
Latest

World Cup Final मध्ये परफॉर्म करणार Dua Lipa, शुभमन गिल म्हणाला…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुआ लिपा ही २८ वर्षाची गायिका वर्ल्ड कपच्या सामन्यात परफॉर्मन्स करणार आहे. दुआ लिपा (World Cup 2023 Final ) सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यावेळी क्लोजिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार आहे. पण दुआ कडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. दरम्यान, एका मुलाखतीत क्रिकेटर शुभमन गिलने गयिकेला प्रश्न विचारला की, तुला वर्ल्ड कप ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनीला कोणत्या गाण्यावर परफॉर्म करायला आवडेल? उत्तरादाखल दुआ म्हणाली, कारण हा एक स्पोर्ट इव्हेंट आहे तर मी फिजिकली गाणे गाईल आणि वन किस किंवा माझं नवं गाणं. (World Cup 2023 Final )

संबंधित बातम्या –

दुआच्या या हिंटमुळे अंदाज लावला जात आहे की, ती वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करेल. सोबतच के एल राहुलने विचारलं की, कोणत्या क्रमांकाची जर्सी घालायला आवडेल. तर तिने आपला २२ लकी नंबर असल्याचे सांगितले. दुआ लिपाचे #Askme हे सेशन भारत व्हर्सेस न्युझीलँड च्या सेमी फायनल सामन्याच्या आधीचे होते, ज्यामध्ये क्रिकेटर्सच्या अनेक प्रश्नांचं उ्तर तिने दिलं होतं.

वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे.

कोण आहे दुआ लिपा?

दुआ लिपा प्रसिद्ध ब्रिटिश गायिका आहे. फुटबॉल जगतातील मोठ्या टुर्नामेंटमध्ये तिने परफॉर्म केलं आहे. तिने मॉडलिंगदेखील केले होते. ती स्वत: गाणी लिहिते. वयाच्या १४ व्या वर्षी तिने यू-ट्यूबवर गाणी अपलोड केले होते. २०१५ मध्ये दुआला मोठी ऑफर मिळाली. तिला वॉर्नर म्युजिक ग्रुपने साईन केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT