Latest

जळगाव : चाळीसगावात अठरा लाखाचा अमली पदार्थांचा साठा जप्त

निलेश पोतदार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा चाळीसगाव येथे शहरातील कोतकर कॉलेज जवळ पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कार मध्ये अज्ञात चालकाने एक क्विंटल 80 किलो 240 ग्रॅम वजनाच्या बोंडे व बोंड यांचा चुरा असा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याची बाजार किंमत 18 02400 रुपये आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध चाळीसगाव पोलिस स्‍टेशनमध्ये एनडीपीएस एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील उत्कर कॉलेज जवळ चाळीसगाव शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची हुंडाई कार क्रमांक एम पी 09 डब्ल्यू सी 1485 या गाडीमध्ये नऊ गोण्यांमध्ये चार काळ्या रंगाच्या व पाच पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या होत्या. त्यात अफूची बोंडे व बोंडांचा चुरा अस गोण्यांमध्ये एक क्विंटल 80 किलो 240 ग्रॅम इतका साठा होता. ज्याची बाजार मूल्य अठरा लाख 2400 रुपये आहे.

या गाडीतून उग्र वास येत असल्याने पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला. ते पाहून सदरील वाहन चालकाने चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळील माल धक्काच्या आतील बाजूस सेंटर लॉक करून मुद्देमाल सोडून वाहन चालक पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी दहा लाखाची पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार व 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल भीमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुंडाई कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहेत.

हेही वाचा ; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT