गाझियाबाद; पुढारी ऑनलाईन : असे म्हणतात की सिनेमा हा समजाचा आरसा आहे. जे समाजात घडतं त्याचेचं चित्रण चित्रपटांमध्ये केले जाते. पण, आपल्याकडे सिनेमात जसे घडते तसेच रियल आयुष्यात घडविण्याचा प्रयत्न सुद्धा लोक करत असतात. अशी एक घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद मध्ये घडली आहे. दृष्यम हा सिनेमा भारतात खूपच लोकप्रिय झाला होता. मूळ मल्याळम भाषेतील सिनेमा नंतर तेलगू, तामिळ, कन्नड आणि हिंदीत सुद्धा निघाला. एक गूढ मर्डर मिस्ट्री हा या चित्रपटाचा विषय आहे. भारतातील जवळ जवळ सर्वांनीच हा चित्रपट नक्कीच पाहिला असणार. अगदी या चित्रपटाच्या पटकथेला साजेशी घटना गाझियाबाद मध्ये घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढला आणि नंतर त्याचा मृतदेह प्रियकराच्याच घरात पुरला. आता तब्बल चार वर्षांनी या मृतदेहाचा शोध लागला आहे. ही मर्डर मिस्ट्रीला हाताळताना पोलिस मात्र चांगलेच चक्रावले होते. (Drishyam Style Murder Mystery)
गाझियाबाद मधील एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पतीचा मृतदेह प्रियकराच्या घरात पुरला. तब्बल ४ वर्षांनी संबधीत प्रियकराच्या घरातून ६ फूट खाली पुरलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेहाची आता फक्त सांगाडे राहिली आहेत. डीएनए चाचणी करिता मृतदेह पोलिसांनी पाठवला असून आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून मृतव्यक्तीचा अत्यंत निघृणपणे खून केला होता. पहिल्यांदा महिलेच्या पतीच्या डोक्यात गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह कुऱ्हाडीने तोडण्यात आला होता. (Drishyam Style Murder Mystery)
हत्येचा थरारक घटनाक्रम (Drishyam Style Murder Mystery)
ही घटना आहे ५ ऑक्टोंबर २०१८ सालातील. गाझियाबाद जिल्ह्यातल्या सिकरोड या गावात चंद्ररवीर उर्फ पप्पू (वय ४२) हे आपली पत्नी सविता (वय ४०) हिच्या सोबत रहात होते. त्यांच्या लग्नाला १४ वर्षे उलटली होती आणि त्यांना एक १२ वर्षांची मुलगी देखील आहे. चंद्रवीर यांच्या घराला लागूनच अरुण याचे घर आहे. चंद्रवीर आणि अरुण चांगले मित्र व दोघे सुद्धा शेतीवरच आपली गुजराण करत होते. ५ ऑक्टोंबर २०१८ रोजी चंद्रवीर याचा भाऊ भूरे सिंह याने नंद्रग्राम पोलिस ठाण्यात आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चंद्रवीर यांना शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली. सर्वत्र शोध व तपास घेऊन झाला पण, चंद्रवीर यांचा थांगपत्ता लागेना. तक्रारीमध्ये भूरेने सांगितले की, त्याच्या वहिनीने आपल्या भावाला बेपत्ता केले आहे. तर दुसरीकडे सविताने आपल्या दीरावरच आरोप केले की, त्यानेच माझ्या पतीला संपत्तीसाठी मारले आहे. पोलिसांनी चहुबाजुंनी तपास केल्यानंतर दोघांविरुद्ध कोणतेच पुरावे न सापडल्याने अनेक दिवसांनी हताश होत न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला. (Drishyam Style Murder Mystery)
पोलिस अधीक्षक जी. के. मुनीराज यांच्या बदलीनंतर घटनेत आला मोठा ट्वीस्ट
जी.के. मुनीराज यांना गाझियाबाद येथे वरिष्ठ पोलिस अधीक्षक पदावर ४ एप्रिल २०२२ मध्ये पाठविण्यात आले. त्यांनी येताच तपास न लागलेल्या जुन्या फायली पुन्हा वर काढल्या. त्यांनी चंद्रवीर यांची केस क्राईम ब्रँचचे प्रभारी अधिकारी अब्दुर रहमान सिद्दीकी यांच्याकडे सोपवली. सिद्दीकी यांनी पुन्हा चंद्रवीर यांचा तपास करण्यास सुरुवात केली. सिद्दीकी यांनी चंद्रवीर यांचे गावकरी आणि शेजारी यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान सिद्दीकी यांना समजले की चंद्रवीर यांचा शेजारी अरुणच्या (वय ३५) सोबत सविताचे अनैतिक संबंध आहेत. यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा सविता आणि अरुण यांच्याकडे वळविला. पण, अडचण ही होती की त्यांच्या विरुद्ध कोणतेच पुरावे नव्हते. (Drishyam Style Murder Mystery)
मुलीला विश्वासात घेत पोलिस पोहचले निष्कर्षापर्यंत
दुसरीकडे चंद्रवीर यांची मुलगी आता १६ वर्षांची झाली होती. ती आपली आई सविता सोबतच रहात होती. ती मुलगी ब्युटी पार्लर चालवत होती. पहिल्यांदा पोलिसांनी चंद्रवीर यांच्या मुलगीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्या मुलीने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. नंतर पोलिसांनी त्या मुलीचे समपुपदेशन केले, त्या मुलीला विश्वासात घेत तिला धीर दिला. त्या मुलीने सांगितले की, आम्ही झोपल्यावर शेजारचे काका घरी यायचे आणि मला त्यांच्यावरच वडिलांना गायब केल्याचा संशय आहे. (Drishyam Style Murder Mystery)
मुलीच्या या जबाबानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. यानंतर पोलिसांनी अरुणला ताब्यात घेतले. पहिल्यांदा अरुणने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो घडाघडा बोलू लागला आणि एकूणच घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला.
अरुणने सांगितले की, मी चंद्रवीरचा शेजारी आहे, माझे त्याच्या घरी सारखे येणे जाणे होते. तो मला लहान भावाप्रमाणे समजत होता. या संबधामुळे वहिनी सविताशी मी हसत खेळत बोलत होतो. २०१७ साली आमचे अनैतिक संबध जुळले. खूप दिवस हे कोणाला कळले नाही. पण हळू हळू सर्वांना कळू लागले. चंद्रवीरने आम्हला नको त्या अवस्थेत पाहिले. यानंतर चंद्रवीर सविताला उठसुठ मारहाण करु लागला. मग आम्ही दोघांनी मिळून चंद्रवीरला संपविण्याचा कट रचला.
चंद्रवीरला संपविण्याचा रचला कट
यावेळी अरुणने पोलिसांना सांगितले, मी माझ्या घरात ६ फुटांचा खड्डा काढला. २८ सप्टेंबर २०१८ रोजी चंद्रवीर दारु पिऊन घरी आला. सविताने फोन करुन मला बोलावले. मी छतावरुन घरात शिरलो. चंद्रवीर बाजल्यावर झोपला होता. त्याच्या डोक्या खाली बादली ठेवली. मी गावठी कट्ट्याने चंद्रवीरच्या डोक्यात गोळी घातली. यानंतर चंद्रवीरचा मृत्यू झाला. डोक्यातून पडणारे रक्त बादलीत पडू लागले. अखेर तास – दीडतासाने रक्त पडणे बद झाले. चंद्रवीरच्या हातात चांदीचे कडे होते. ते मला हवे होते. पण, ते काही केल्या निघेना यासाठी मी कुऱ्हाडीने त्याचा हात तोडला. मी आणि सविताने मिळून चंद्रवीरचा मृतदेह माझ्या घरात नेला व खणलेल्या खड्ड्यात पुरला. तसेच त्याचा हात गावातल्या केमिकल कारखान्याच्या बाजूला फेकला. काही दिवसांनी मी चंद्रवीरला पुरलेल्या खड्ड्यावर सिमेंटने प्लास्टर करुन घेतले. त्यामुळे खाली काय आहे हे कोणालाच कळत नव्हते. त्याच खड्ड्याच्यावर मी चटई टाकून रोज झोपतो, असे अरुणने पोलिसांसमोर कबूल केले.
अधिक वाचा :