Latest

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरु

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा प्लॅटफॉर्म इंकने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरु केले आहे. मेटाचे पॉलिसी कम्युनिकेशन डायरेक्टर अँडी स्टोन यांनी याबबत गुरुवारी (दि.९) माहिती दिली. सहा जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये प्रचंड गदारोळ, गोंधळ आणि हिंसाचारानंतर अनेक सोशल मीडिया कंपन्यांनी ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी घातली होती. (Donald Trump)

फेसबुकचे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष निक क्लेग यांनी जानेवारी २०२3 ट्रम्प यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे सांगितले होते. ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांची फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील असलेली बंदी येत्या आठवड्यात उठवणार आहे. त्याचबरोबर हेही सांगितले आहे की, जर डोनाल्ड यांनी सोशल मीडिया धोरणांचे उल्लंघन केल्यास त्यांनी काय शेअर केले आहे आणि त्याची काय तीव्रता आहे. यानुसार एक महिना ते दोन वर्षांच्या दरम्यान निलंबनाचा दंड आकारला जाईल. त्यानंतर त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरु केले आहे.

फेसबुकच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांना आगामी निवडणुकीसाठी त्यांच्या 34 दशलक्ष अनुयायांशी थेट संवाद साधता येईल. इतकेच नव्हे तर त्यांना थेट निधी उभारणीस पुन्हा सुरू करण्यास देखील अनुमती मिळणार आहे. जानेवारीपर्यंत त्यांचे इंस्टाग्रामवर २३ दशलक्ष आणि फेसबुकवर ३४ दशलक्ष फॉलोअर्स होते.

Donald Trump : काय होती ट्रम्प यांची शेवटची पोस्ट 

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटल हिल हिंसाचाराच्या संदर्भात शेवटची इंस्टाग्राम पोस्ट लिहिली होती. ती सहा जानेवारी २०२३ मध्ये शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना 'सेव्ह अमेरिका' (Save America) मोर्चासाठी कॅपिटल हिलमध्ये प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले होते. तर फेसबुकवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हंटलं होत की,"मी यूएस कॅपिटलमधील सर्वांना शांतता राखण्यास सांगत आहे. कोणतीही हिंसा करू नका! लक्षात ठेवा, आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा पक्ष आहोत. धन्यवाद!'"

ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंटही सुरु 

काही दिवसांपूर्वीच त्यांच ट्विटर अकाउंट शेअर केले आहे. इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर त्यांनी ट्विटरसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु केले. त्यांचे ट्विटर अकाऊंट ८ जानेवारी २०२१ पासून बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांनी अद्याप ट्विटरवर कोणतेही ट्विट शेअर केलेले नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT