पुढारी ऑनलाइन डेस्क : Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील एका पत्रकार, स्तंभ लेखिका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आणि मानहानी केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. या प्रकरणी त्यांना न्यायालयाने 5 मिलियन डॉलर म्हणजेच 41 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी सुरुवातीला पीडित तक्रारदार महिला पत्रकार लेखिकेच्या आरोपांना फेटाळले. मात्र, नंतर तीन तासांच्या वैचारिक चर्चेनंतर बारकाईने पाहिले असता त्यांच्या अन्य आरोपांना दिवाणी खटल्यात कायम ठेवण्यात आले आहे.
अमेरिकेतील एका पत्रकार, लेखिका आणि स्तंभकार (वय 79) यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध न्यायालयात सुनावणी वेळी आरोप लावले होते. त्या म्हणाल्या माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका लग्जरी डिपार्टमेंट स्टोअरमध्ये त्यांच्यावर बलात्कार केले होता. त्या म्हणाल्या की 27 वर्षांपूर्वी 1996 मध्ये गुरुवारी सायंकाळी त्या बर्गडोर्फ गुडमैनमध्ये ट्रम्प यांना भेटल्या होत्या. तिथे ट्रम्प यांनी महिलांचे अंतर्वस्त्र खरेदी करण्यासाठी त्यांची मदत मागितली होती. त्यावेळी त्यांनी कपडे बदलण्याच्या खोलीत त्यांच्यावर बलात्कार केला.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, डोनाल्ड यांच्या भीतीपोटी त्यांनी कोणालाही काहीही सांगितले नाही. याबाबत त्यांनी आपल्या दोन जवळच्या मित्रांना सोडून अन्य कोणालाही सांगितले नाही. तसेच त्यांना अशी भीती होती की डोनाल्ड ट्रम्प यासाठी त्यांच्याशी बदला घेतील. तसेच या घटनेसाठी लोक त्यांनाच जबाबदार धरतील. मात्र, मी टू मोहिमेनंतर त्यांनी स्वतःवरील आपबिती लोकांना सांगण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये एका पुस्तकात त्यांनी सर्व प्रथम याचा उल्लेख केला होता. लैंगिक शोषणाच्या आरोपाबरोबरच पत्रकार महिलेने 2022 मध्ये ट्रम्प यांनी ब्लॉग लिहून आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला. याप्रकरणी त्यांनी मानहानीचा देखील दावा दाखल केला होता.
ट्रम्प यांनी लेखिकेचे आरोप फेटाळले होते. तसेच गेल्या 4 मे रोजी त्यांनी लेखिकेच्या या आरोपांना हास्यास्पद आणि घृणित कथा म्हटले आहे. न्यूयॉर्कमध्ये 3 मे रोजी एका व्हिडिओच्या माध्यमातून ज्यूरींच्या समक्ष साक्ष दिली होती. त्यात त्यांनी दावा केला होता की माझ्यावरील सर्व आरोप बनावट आहेत. त्यांनी मॅनहॅटनच्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये लेखिकेसोबत कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार केला नव्हता.
अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यायालयात 25 एप्रिल पासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. काल मंगळवारी 9 सदस्यीय खंडपीठाने ट्म्प यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. त्यात डोनाल्ड यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही. कारण हा खटला फौजदारी नव्हे तर दीवाणी न्यायालयासमोर आला आहे. ज्युरींनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्यांना ज्येष्ठ लेखिका पीडित महिला पत्रकार लेखिकेला 5 दशलक्ष डॉलर भरपाई देण्याचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयावर ट्रम्प यांनी सार्वजनिक रित्या बदनामीचे कारण आणि सार्वजनिकरित्या अपमानास्पद आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना या निकालाने जबर धक्का बसला आहे. कारण ते पुढच्या वर्षीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी ओपिनियन पोलमध्ये ट्रम्प रिपब्लिकन उमेदवारांचे नेतृत्व करत आहेत पण या निर्णयाने त्यांना धक्का बसला आहे.
हे ही वाचा :