Latest

Life Style : तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते का? हे असू शकते कारण…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style तुमचं छानसं छोटसं कुटुंब आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. मात्र तुमच्या घरात सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडते का ? घरात सातत्याने कुणी ना कुणी आजारी पडल्याने घरात येणारा पैसा डॉक्टर आणि औषधोपचारांवरच खर्च होतो. अशा परिस्थितीत तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तुम्हाला तो कमीच पडतो.  हे सर्व तुमच्या कुटुंबातही घडत आहे का? ( Life Style )  असे घडत असेल तर तुम्हाला यामागील कारण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी….

( Life Style ) घरात जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर तुम्हाला या काही गोष्टी तुमच्या घरातील तपासायला हव्या. तसे पाहिले तर वर-वर आपल्याला वातावरणातील बदल, फास्ट फूड खाणे किंवा ट्रॅव्हलिंग करणे तसेच पाण्यात होणारे बदल या गोष्टी कारणीभूत आहेत असे तुम्हाला वाटते. त्यानुसार तुम्ही डॉक्टरांकडे जाता औषध घेता आणि बरे होता. पुन्हा आजारी पडला की पुन्हा डॉक्टर हे चक्र संपतच नाही, असे तुमच्या घरात होत आहे का? असे असेल तर तुम्हाला या भौतिक कारणाव्यतिरिक्त थोडा वेगळा विचार करावा लागेल.

काही वास्तुतज्ज्ञांच्या से म्हणतात. तुमच्या जीवनात येणारी कोणत्याही प्रकारची समस्या ही तुम्ही ज्या घरात राहता त्या घरामुळे आलेली असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते तुमच्या घरात जर शौचालय आणि बाथरूम चुकीच्या दिशेत असेल तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कारण त्यामुळे आवश्यक त्या उर्जेचा प्रवाह अडतो परिणामी अशा ठिकाणातील उर्जा दुषित झालेली असते. याच्‍या सानिध्यात आपण असतो. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो.

Life Style वास्तू तज्ज्ञांच्या मते जर तुमच्या घरात शौचालय आणि बाथरूम हे इशान्य दिशेत असेल तर तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागते. किंवा कुटुंबातील एकच व्यक्ती सतत आजारी पडते. अन्यथा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला एखादा गंभीर आजार जडतो.

वास्तू तज्ज्ञांच्या मते इशान्य दिशेत कधीही शौचालय किंवा बाथरूम नसावे. कारण इशान्य दिशा ही विशेष करून देवाची किंवा पूजा अर्चा करण्याची जागा असते. या जागेवरील उर्जेचा प्रवाह हा नेहमी खेळता राहुन चांगला असायला हवा. मात्र, या जागेत जर शौचालय किंवा बाथरूम बांधले तर सातत्याने प्रवाहित उर्जा दुषित व्हायला सुरुवात होते. कारण शौचालय किंवा बाथरूम या दोन्ही ही गोष्टी नकारात्मक उर्जेने भरलेल्या असतात. परिणामी ईशान्य दिशेतील उर्जा प्रदुषित होते. अशा जागेचा आपण वारंवार उपयोग करतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबात सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडते, असे वास्तु तज्ज्ञांचे मत आहे. वास्तु तज्ज्ञांच्या मते शौचालय आणि बाथरूम हे वायव्य दिशेत असावे.

परिणामी तुमच्या कुटुंबात सातत्याने कुणी ना कुणी आजारी पडत असेल तर तुमच्या घरात शौचालय किंवा बाथरूम कोणत्या दिशेत आहे, हे तपासा. जर इशान्य दिशेत बाथरूम आणि शौचालय असेल तर एखाद्या चांगल्या वास्तू तज्ज्ञाकडून तुम्हाला यावर काय उपाययोजना करता येईल याविषयी सल्ला घेऊ शकता.

Life Style तसेच जे लोक नवीन घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करीत आहे. त्यांनी घराचे बांधकाम करताना किंवा नवीन घर घेताना एकदा शौचालय आणि बाथरूम कोणत्या दिशेत आहे याचा संपूर्ण विचार करून मगच बांधकाम करावे किंवा घर खरेदी करावे असे वास्तू तज्ज्ञ सांगतात.

( वरील लेखातील माहिती ही पूर्णपणे वास्तू शास्त्राशी संबंधित तज्ज्ञांनी दिलेली माहिती आहे. वाचकांनी तज्ज्ञांकडून सल्ला घेवूनच पुढील निर्णय घ्यावा…. )

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT