मेलबर्न; पुढारी ऑनलाईन
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच व्हिसा रद्द केल्याप्रकरणी केलेल्या अपीलविरोधातील खटला हरला आहे. यासह, तो वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमधूनही बाहेर पडला. फेडरल कोर्टानेही जोकोविचला ऑस्ट्रेलियात तीन वर्षांसाठी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
कोरोनाविरुद्ध लस न घेतल्याने जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला. त्याला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात इमिग्रेशनच्या ताब्यात घेण्यात आले. व्हिसा रद्द करण्याच्या विरोधात त्याने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. फेडरल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी रविवारी होती, तर वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन सोमवारपासून सुरू होत आहे.
इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉके यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी सार्वजनिक हिताच्या कारणास्तव ३४ वर्षीय सर्बियनचा व्हिसा रद्द करण्यासाठी मंत्री म्हणून आपल्या विशेषाधिकारांचा वापर केला आहे.
दरम्यान, सोशल मीडिया पोस्टमध्ये, जोकोविचने कबूल केले की त्याच्या प्रवासाच्या तपशीलाच्या फॉर्ममध्ये चूक झाली होती परंतु त्याने त्याच्या एजंटकडून अनावधानाने झालेली मानवी चूक म्हटले होते.
२०२२ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नऊ वेळचा चॅम्पियन जोकोविचचा पहिला सामना देशबांधव मिओमिर केकमानोविक विरुद्ध होता. हा सामना सोमवारी होणार होता, जोकोविचला या स्पर्धेत आपले विजेतेपद राखायचे होते.
जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या कडक कोरोना व्हायरस लसीकरण नियमांमधून वैद्यकीय सवलतीसाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे त्याचा व्हिसा गेल्या आठवड्यात मेलबर्नमध्ये आल्यावर ऑस्ट्रेलिया बॉर्डर फोर्सने रद्द केला होता. त्याने हॉटेलमध्ये चार रात्री घालवल्या, त्यानंतर न्यायाधीशांनी सोमवारी त्यांच्या बाजूने निकाल दिला.
हे ही वाचलं का ?