Latest

Disney+ Hotstar भारतात डाउन! यूजर्संना लॉग इन करता येईना, पाहा नेमकं काय झालं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंनोरंजन क्षेत्रातील दिग्गज असलेले Disney+ Hotstar भारतात डाउन झाले आहे. Downdetector.in ने या आउटेजच्या ५०० हून अधिक घटनांची नोंद केली आहे. अनेक यूजर्संनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना एरर मेसेज आले. याबाबतचे स्क्रीनशॉट अनेक यूजर्संनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

डेस्कटॉप आणि डिस्ने+ हॉटस्टार दोन्ही यूजर्संनी याच समस्यांबद्दल तक्रारी नोंदवल्या आहे. ही समस्या सुमारे ४५ मिनिटे कायम राहिल्याचे यूजर्संनी म्हटले आहे. डाउनडिटेक्टरवरील आउटेज मॅपनुसार, दिल्ली, जयपूर, लखनौ, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद, मुंबई आणि चंदीगडमध्ये सर्वाधिक Disney+ Hotstar डाउनची समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, Disney+ Hotstar ने या आउटेजची पुष्टी केली आहे. त्यानी दावा केला आहे की अॅप्स आणि वेबवर काही तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर लाईव्ह स्ट्रिमिंग सेवा देणाऱ्यांनी म्हटले आहे की समस्या लवकरच सोडवली जाईल. यावर त्यांची टीम काम करत आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे Disney+ Hotstar वर LIVE स्ट्रिमिंग सुरु आहे. पण या आउटेजमुळे सामना पाहण्यात अडचण निर्माण झाली आहे. LIVE स्ट्रीमवर एक एरर मेसज येत असल्याचे यूजर्संनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT