Khatron Ke Khiladi 13 
Latest

Khatron Ke Khiladi 13 च्या ट्रॉफीवर डीनो जेम्सनं कोरलं नाव; कोण आहे डीनो जेम्स?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'खतरों के खिलाडी १३' (Khatron Ke Khiladi 13) हा शो चाहत्याच्या घराघरांत पोहोचला आहे. खतरों के खिलाडी म्हटलं की, अंगावर शहारे आणणारे नवनविन टास्क शोमध्ये पहायला मिळतात. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यानंतर या स्पर्धक डीनो जेम्स (Dino James) याने 'खतरों के खिलाडी १३' च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. डीनो याला ट्रॉफी आणि कारसह २० लाख रुपये बक्षीस मिळाले आहेत.

संबधित बातम्या 

'खतरों के खिलाडी १३' च्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि डीनो जेम्स या स्पर्धकांचा समावेश होता. 'खतरों के खिलाडी १३' च्या प्रत्येक भागात स्पर्धकाला एका वेगवेगळ्या खरतनाक टास्कमधून जावं लागलं आहे. चाहत्यांच्या मनोरंजनासोबत या शोत खतरनाक टास्क पाहायला मिळाले. याच दरम्यान हा शो शेवटच्या टप्पा म्हणजे महाअंतिम सोहळा पार पडला.

'खतरों के खिलाडी १३' च्या शेवटच्या टप्प्यात ऐश्वर्या शर्मा, डीनो जेम्स, अर्जित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली. शेवटी 'खतरों के खिलाडी १३' च्या ट्रॉफीवर डीनो जेम्सने आपलं नाव कोरलं. डीनो याला ट्रॉफी आणि कारसह २० लाख रुपये बक्षीस मिळाले आहेत. याबद्दलची माहिती मिळताच डीनो जेम्सचे भरभरून कौतुक केलं आहे.

या शोमध्ये डिनो जेम्ससोबत रश्मीत कौर, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, निर्रा एम बॅनर्जी, साउंडस मौफकीर, शिव ठाकरे, अर्जिता तनेजा, अंजली आनंद, रोहित बोस रॉय, रूही चतुर्वेदी, अंजुम फकीह, डेजी शाह आणि शीझान खान हे स्पर्धकांनी भाग घेतला होता.

कोण आहे डीनो जेम्स

'खतरों के खिलाडी १३' चा विजेता डिनो जेम्स हा एक प्रसिद्ध रॅपर सिंगर आहे. डिनोला 'लूझर' या गाण्याने खूपच लोकप्रियता मिळाली. याशिवाय डिनोने अनेक मालिकामध्ये काम केलं आहे. २०१६ नंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्याने सुपरहिट गाणी गायिली. यात अनस्टॉपेबल, हँकॉक, माँ, यासारख्या गाण्याचा समावेश आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT