Latest

Dhule : पीएचडीसाठी मार्गदर्शकास 50 हजाराची लाच देणाऱ्या शिक्षकास बेड्या

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा : पीएचडीसाठी मार्गदर्शकास पन्नास हजाराची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास  धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. धुळे (Dhule) शहरातील नगाव बारी चौफुली जवळील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पीएचडी चे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य सुरू आहे. त्यापैकी साक्री तालुक्यातील बसरावळ येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक सुकेंद्र किसनराव वळवी यांचादेखील समावेश आहे. वळवी यांनी 2015 मध्ये पीएचडी पदवी करिता विद्यापीठात नोंदणी केली असून त्यांनी विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संशोधन पद्धती नुसार अभ्यास करून शोध प्रबंधाचे लेखन करून सहामाही प्रगती अहवाल मार्गदर्शक यांच्या सहीने सादर करणे आवश्यक आहे. हा संशोधन शोध प्रबंधाच्या सहामाई अहवालाचे प्रकरण मार्गदर्शक यांनी तपासून त्यामध्ये काही त्रुटी दर्शवून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. (Dhule)

परंतु वळवी यांनी तक्रारदार यांना पीएचडीचे संशोधन प्रबंधाचे सहामाही प्रगती अहवाल मार्गदर्शक म्हणून प्रमाणित करून विद्यापीठात सादर करण्यास परवानगी द्यावी व त्यांना लवकर पीएचडीची पदवी मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांना संपर्क करून लाच देण्याची तयारी दाखवली.(Dhule)

तक्रारदार यांची इच्छा नसताना त्यांना पैशांचे आमिष दाखवणे सुरू केले. हा प्रकार वारंवार होत असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदार यांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे तसेच शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, प्रशांत खलाने, भूषण रोटे, महेश मोरे आदींनी धुळ्याच्या नगावबारी परिसरात असलेल्या हॉटेल बालाजी येथे सापळा लावला.

यानंतर ठरल्याप्रमाणे सुकेंद्र वळवी हे पीएचडीचे मार्गदर्शक तथा तक्रारदार यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम देत असताना वळवी यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT