धुळे : पुढारी वृत्तसेवा – धुळ्यातील देवपूर परिसरात झालेल्या घरपोडीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. ही घरफोडी दोघा अल्पवयीन बालकांच्या मदतीने करणाऱ्यास चोरीस गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
देवपूर परिसरात झालेल्या घरफोडीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सुरू केला. त्यांना हा गुन्हा धनंजय अरुण वाकळे या तरुणाने केला असून त्यासाठी दोघा अल्पवयीन बालकांची मदत घेतली असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे शिंदे यांच्या पथकाने धनंजय वाकळे याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा कबूल केल्याची माहिती देत असतानाच सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह भांडे असा ऐवज पोलिसांना काढून दिला आहे. या चोरट्यांना देवपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा :